जिल्हा संघाने दूध संकलन केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:02+5:30

वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाला ७ ते ८ हजार लीटर दुध दररोज संकलन करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार दररोज दुधाचे संकलन जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संस्थाकडून केले जात होते. पालकमंत्री तथा राज्याची दुग्ध उत्पादन व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही दुध संकलन बंद करू नका अशा सुचना आढावा बैठकीत दिल्या होत्या.

District union closed milk collection | जिल्हा संघाने दूध संकलन केले बंद

जिल्हा संघाने दूध संकलन केले बंद

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : संचारबंदीत दूध फेकावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात सर्वत्र दुध पुरवठा व वाहतुक सुरू असतांना वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाने मात्र दुध संकलीत करण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. आपले दुध त्याला ग्रामीण भागातून शहरातून विक्रीसाठी नेता येत नाही. त्यामुळे संचारबंदीच्या काळात दुध फेकून देण्याची वेळ जिल्हा दुध उत्पादक संघाने शेतकऱ्यांवर आणली आहे.
वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाला ७ ते ८ हजार लीटर दुध दररोज संकलन करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार दररोज दुधाचे संकलन जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संस्थाकडून केले जात होते. पालकमंत्री तथा राज्याची दुग्ध उत्पादन व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही दुध संकलन बंद करू नका अशा सुचना आढावा बैठकीत दिल्या होत्या.
ही बैठक पार पडताच लगेच दुसºया दिवशी जिल्हा दुध उत्पादक संघाने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना पत्र पाठवून आपल्या संस्थेकडून दुध संकलीत करणे शक्य होणार नाही त्यामुळे दुध संकलनाचे काम बंद करण्यात येत असल्याचे कळविले आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातून दुध संकलनाचे काम ठप्प झाले आहे. याचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकºयांना बसत आहे. संचारबंदी असल्याने घरी पडून असलेले दुधही त्यांना शहराकडे विक्रीसाठी आणता येत नाही. व गावातही दुधाला कोणी ग्राहक नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे दूध नदी, नाल्यांमध्ये विसर्जीतच करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पालक मंत्री सुनील केदार यांच्याशी या संदर्भात आपण चर्चा केली. त्यांनी दिनशॉ सह सर्व खाजगी कंपण्यांना दुध संकलीत करावे अशा सुचना दिल्या होत्या. वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाकडे नागपूर जिल्हा संघाचेही ७ हजार लीटर दुध दररोज येत असते. मात्र आपल्या येथून वारणा दुध संघाकडे जाणारा टँकर घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आपल्या जवळ दुध डंप होत आहे. म्हणून ग्रामीण भागातून दुधाची खरेदी थांबवावी लागली आहे. यासंदर्भात आपण ना.सुनील केदार यांच्याकडे पाठ पुरावा करीत आहोत. यात दुध उत्पादक शेतकºयांचे नुकसान होत आहे.
- सुनील राऊत, अध्यक्ष वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघ.

 

Web Title: District union closed milk collection