शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ंशवविच्छेदनगृहाला झुडपांचा विळखा

By admin | Updated: May 20, 2014 23:50 IST

स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे़ समोरचा परिसर झाडा-झुडपांनी वेढला आहे़ मृत्यूनंतर प्रेतांचे शवविच्छेदन करण्यासाठी जाणार्‍या नातेवाईकांना

सेलू : स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे़ समोरचा परिसर झाडा-झुडपांनी वेढला आहे़ मृत्यूनंतर प्रेतांचे शवविच्छेदन करण्यासाठी जाणार्‍या नातेवाईकांना ही अवस्था पाहिल्यावर संताप यावा, अशी स्थिती आहे़ रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे़ शासन कितीही कल्याणकारी योजना राबवित असले तरी त्याचा लाभ सामान्य नागरिकांना मिळताना खूप अडचणी येतात़ अपघाती निधनानंतर वा आवश्यक प्रसंगी मृतांचे शवविच्छेदन करण्यात येते़ रात्रभर प्रेत त्या खोलीत तसेच टाकून दिले जाते़ अपघातात छिन्नविछिन्न झालेल्या मृतदेहाची दुर्गंधी सुटते़ शासनाने यासाठी ग्रामीण रुग्णालयाला दोन मृतदेह ठेवता येईल, अशी शीतपेटी (टु बॉडी मरच्युरी कॅबिनेट) दिली; पण गत वर्षभरापासून ती मशीन ठेवण्यासाठी आवश्यक खोली उपलब्ध नाही़ नव्याने खोली बांधण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावित आहे; पण एवढ्या काळात एका खोलीच्या बांधकामाअभावी ती शीतपेटी लावण्यात आली नाही़ यामुळे मृतदेहांची मृत्यूनंतरही अवहेलनाच होत असल्याचे दिसून येते़ शवविच्छेदन करण्यासाठी काही डॉक्टर नकार देतात़ प्रसंगी पोलिसांनाही मनस्ताप सहन करावा लागतो़ नातेवाईकांकडून अशाप्रसंगी भावनेचा उद्रेक होतो़ येथे आक्रतीबंधाप्रमाणे दोन स्वापरच्या जागा आहेत़ एक महिला स्वीपर कार्यरत असून पुरूषाची जागा रिक्त आहे़ परिणामी, शवविच्छेदनासाठी वर्धा येथून स्वीपर येईपर्यंत शवविच्छेदनाचे कार्य अडून राहते़ प्रसंगी तो आला नाही तर मृतदेहाचा प्रवास पुन्हा वर्ध्याला करण्याची दुर्दैवी वेळ येते़ या ग्रामीण रुग्णालयात एका महिला (गायनिक) डॉक्टरची गरज आहे़ पुरूष डॉक्टरांना महिला काही आजार सांगण्यास संकोच करतात़ तात्पुरत्या पाठविलेल्या त्या डॉक्टरऐवजी एक महिला (गायनिक) डॉक्टर देण्याची मागणी आहे़ ग्रामीण रुग्णालयात तात्पूरत्या आलेल्या डॉक्टरच्या अविवेकी बोलल्याने प्रसंगी वाद उद्भवतात़ येथील इतर चांगल्या सेवाभावी डॉक्टरांना याचा अकारण मनस्ताप होत आहे़ वरिष्ठांनी त्वरित शीतपेटी लावण्यासाठी खोलीचे बांधकाम करून द्यावे व एका महिला डॉक्टराची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)