शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मूळ किमान वेतन व राहणीमान भत्त्यापासून कर्मचारी वंचित

By admin | Updated: October 18, 2014 23:46 IST

शासकीय कर्मचारी सहाव्या वेतन आयोगानंतर आता सातव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत आहे; पण ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना अद्यापही मूळ किमान वेतन व राहणीमान भत्ता लागू करण्यात आलेला नाही.

वर्धा : शासकीय कर्मचारी सहाव्या वेतन आयोगानंतर आता सातव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत आहे; पण ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना अद्यापही मूळ किमान वेतन व राहणीमान भत्ता लागू करण्यात आलेला नाही. यामुळे ग्रा.पं. कर्मचारी आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. या कर्मचाऱ्यांची दिवाळीही अंधारात जाण्याची शक्यता आहे.याबाबत शासनस्तरावरून त्वरित सकारात्मक पावले उचलण्यासाठी नुकतेच आष्टी पं.स. च्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मूळ किमान वेतन व राहणीमान भत्ता देणेबाबतचा आदेश ग्रामविकास व जलसंधारण विभागाने कधीचाच काढला आहे; पण अद्याप ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना त्या आदेशानुसार मूळ किमान वेतन व राहणीमान भत्ता लागू करण्यात आला नाही. २ जानेवारी, १८ जुलै, ७ आॅगस्ट आणि १६ सप्टेंबर २०१४ अशा ४ वेळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले; पण अद्याप कारवाई झालेली नाही. वास्तविक शासनाच्या निर्णयानुसार मूळ किमान वेतन व राहणीमान भत्ता लागू करणे बंधनकारक होते; पण अद्याप त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद तथा राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना भविष्यात सातवा वेतन आयोगही लागू होईल; पण किमान वेतनावर जगत कुटुंबाचा गाढा हाकणाऱ्या ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना सुधारित मूळ किमान वेतन तसेच थकबाकी लागू करण्यास टाळाटाळ केली जाते. पंचायत समितीस्तरावर अनेकदा बैठका झाल्या. कर्मचारी संघटनेनेही पाठपुरावा केला; पण अद्याप ग्रा.पं. कर्मचाऱ्यांकडे लक्ष देण्यात आले नाही. १० वर्षे पूर्ण झाले व वय ४५ वर्षांच्या आत आहे, अशा ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे सेवा ज्येष्ठता यादीत नाव समाविष्ट करणे, २०११ च्या जनगणनेनुसार सुधारित आकृतिबंध तयार करणे, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना वेतनासाठी १०० टक्के अनुदान शासनाने द्यावे याबाबत ग्रा.पं. स्तरावर ठराव पारित करून पाठविणे आदी मागण्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)