शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकअभावी सेलूत अपघाताची श्रृंखला

By admin | Updated: May 22, 2014 01:23 IST

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे नागपूर-वर्धा मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले

सेलू : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे नागपूर-वर्धा मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सेलू येथील उडाण पुलाजवळ अनेकदा गतिरोधकाची मागणी करूनही महत्त्वाच्या ठिकाणी गती कमी करण्यासाठी गतिरोधक नाही. महामार्गावर वाहनांची गती अधिक राहत असल्याने अपघाताच्या घटना वाढ होत आहे. शिवाय सांकेतिक चिन्ह दर्शविणारे फलक नसल्याने वाहन चालकांची दिशाभुल होते.

यामार्गाने वर्धा, यवतमाळ, नागपूरकडे जाणारी वाहतूक असते. राज्यमार्ग असल्याने वाहनांची गती अधिक असते. उडान पुल परिसरात गतिरोधक नसल्याने रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍यांना अपघात होतो. वाहनांना गती कमी करण्यासाठी दर्शविणारे पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाही. या भागात गरज असताना या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात आहे. नागपूरकडून वध्र्याकडे जाताना सेलू येथील उडाणपुलावर चढण्याआधी अनिल सॉ मिलजवळ धोकादायक चौरस्ता आहे. या ठिकाणावरून सेलू शहरात जाणारे वाहने बायपास जावी म्हणून महामार्ग व बायपास रस्त्याच्या मधात रस्ता दुभाजक लावण्यात आले आहे. अनेक वर्षापासून दुभाजकाची नव्वद टक्के शती झाली आहेत. भरधाव वाहने मधातूनच मार्ग काढून महामार्गावर येतात. यामुळे अपघात वाढले आहे. कधीकधी महामार्गावरील वाहने भरधाव गावात जाण्यासाठी या फुटक्या रस्ता दुभाजकातून घुसतात. या गोंधळात अनेकदा अपघात होऊन जीव गेला आहे. कित्येकांना अपंगत्व आले. मात्र निगरगट्ट रस्ता विकास महामंडळाचे अधिकारी याकडे लक्षच देत नाही.

उडाणपुलावर चढण्यासाठी वाहने आपली गती अधिक वाढवितात व मधात असलेल्या रस्त्याबाबत सूचना फलक नसल्याने नव्या वाहनचालकांना माहिती नसते यामुळे या स्थळावर अपघात होतात. तसेच सांकेतिक चिन्ह दर्शविणारे फलक नसल्याने अनेकदा वाहन चालकांची तारांबळ उडते. उपाययोजना केल्यास काही प्रमाणात अपघाताला आळा बसू शकतो.