शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीमध्ये होते नोटांचे विद्रुपीकरण

By admin | Updated: December 25, 2016 02:18 IST

नोटबंदीच्या निर्णयानंतर बाजारात आलेल्या नव्या नोटांवर काही लिहून विद्रुपीकरण होणार नाही,

वाहकांचा हिशेब नोटांवरच : विदु्रप नोटा बँकांतून येतात परत; सामान्य नागरिकांची गोची प्रशांत हेलोंडे  वर्धा नोटबंदीच्या निर्णयानंतर बाजारात आलेल्या नव्या नोटांवर काही लिहून विद्रुपीकरण होणार नाही, याची काळजी घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात चर्चा झाली; पण त्याचा कुठलाही उपयोग होताना दिसत नाही. राज्य परिवहन विभागातील वाहक तिकिटांचा हिशेब लावताना हा निर्णय धाब्यावर बसवून थेट नोटांवरच लिहित असल्याने त्यांचे विद्रुपिकरण होत असल्याचे दिसते. या कर्मचाऱ्यांकडून विद्रुपिकरण झालेल्या नोटा नागरिकांच्या हाती येतात. ते नागरिक या नोटा बँकेत जमा करण्याकरिता गेले असता त्यांना बँकेकडून परत करण्यात येतात. यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसणे आलेच. यावर राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत वाहकांना नोटांवर लिहून त्याचे विद्रुपिकरण टाळण्याची ताकीत देण्याची गरज निर्माण झाली आहे. चलनी नोटांवर पेन, पेन्सीलने लिहिले जात असल्याने मोठ्या प्रमाणात नोटांचे विद्रुपिकरण होत आहे. परिणामी, तेवढ्या रकमेचा तोटा रिझर्व्ह बँकेला पर्यायाने देशाला सोसावा लागतो. विद्रुप झालेल्या नोटा चलनातून बाद करण्याकरिता व त्या पुन्हा छापण्याकरिता पैसा खर्च करावा लागतो. हा तोटा टाळण्याकरिता रिझर्व्ह बँकेने नोटांचे विद्रुपिकरण करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. पेन, पेन्सील आदींनी लिहिलेल्या नोटा बँकेत घेतल्या जाणार नाही, असेही स्पष्ट केले होते. असे असले तरी या निर्देशांकडे बँकांसह नागरिक, नोकरदार यासह सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. परिणामी, नोटांच्या विद्रुपिकरणाचे सत्र थांबले नाही. १० ते १००० रुपयांच्या नोटांवर काही ना काही लिहिलेले आढळून येते. १० आणि ५० रुपयांच्या अनेक नोटांवर तर विविध चित्र काढल्याचेही आढळून आले आहे. नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज नव्याने बाजारात दाखल झालेल्या २००० आणि ५०० रुपयांच्या नोटांवर कुठल्याही प्रकारचे लिखाण केलेले आढळल्यास त्या नोटा बँकांतून परत केल्या जात आहेत. नवीन नोटांवर कुणीही काहीही लिहिले तर त्या बँकेत घेतल्या जाणार नाहीत, या निर्णयाची आता आणखी कठोर अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे नोटांच्या विदु्रपिकरणाला चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २००० च्या नवीन नोटांवर पेन्सीलने लिहिलेले आढळले असता एका बँकेने ती नोट स्वीकारण्यास नकार दिल्याचा प्रकार शहरातच घडल्याने नागरिकांनी सावध होणे गरजेचे झाले आहे. वाहकांचा हिशेब बसमध्येच असतो ‘रेडी’ वाहक बसमध्येच आपले हिशेब ‘रेडी’ ठेवतात. हा हिशेब करताना ते नोटांवरच तो मांडतात. १० रुपयांच्या किती नोटा, ५० आणि १०० रुपयांच्या किती हे त्या नोटांवरच लिहितात. यातही वाहकांकडे पेन्सील नव्हे तर पेन असल्याने या नोटांचे विद्रूपिकरण आलेच. हा प्रकार टाळण्यासाठी परिवहन महामंडळाच्या वाहकांनी तसेच प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात कर्मचारी व सामान्यांनी काळजी घेणेच गरजेचे झाले आहे.