‘त्या’ अपघाताच्या चौकशीची मागणी

By Admin | Updated: November 18, 2016 02:14 IST2016-11-18T02:14:02+5:302016-11-18T02:14:02+5:30

आई-वडिलांना माहिती न देता चिखलदरा येथे गेलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला.

Demand for 'that' accident report | ‘त्या’ अपघाताच्या चौकशीची मागणी

‘त्या’ अपघाताच्या चौकशीची मागणी

वर्धा : आई-वडिलांना माहिती न देता चिखलदरा येथे गेलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात १५ नोव्हेंबर रोजी झाला. यातील चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे मृत युवकाच्या वडिलांनी म्हटले आहे. या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
अभिनव विजय मून (१७) रा. स्नेहलनगर वर्धा असे मृतक युवकाचे नाव आहे. तो सानेवाडी येथील त्याच्या मामा-मामीसोबत आई-वडिलाला न सांगता चिखलदरा येथे कार क्र. एमएच ३२ वाय ३७३९ ने गेला. चिखलदरा येथून परत येताना कारला वर्धा-पुलगाव मार्गावरील धोत्रा गावाजवळ अपघात झाला. यातील चालक अभिनवचे मामा धिरज ताराचंद कुलकर्णी हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांचे नियंत्रण सुटून गाडीने तीन ते चार कलाटण्या घेतल्या व ती रस्त्याच्या बाजूला शेतात वीज खांबाला धडकली. अपघात एवढा भीषण होता की वीज खांबाचे तुकडे झाले. यात अभिनवच्या डोक्याला जबर मार लागला. त्याचा सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात अभिनवचा मृत्यू संशयास्पद असल्याने चौकशी करावी, अशी मागणी विजय मून यांनी निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Demand for 'that' accident report