शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मृगधारांनी शेतकऱ्यांच्या आशेला पालवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार लाख २८ हजार २१५ हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनने चांगलाच दगा दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये कपात केली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी एक लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची, तर दोन लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती.

ठळक मुद्देजिल्ह्यात पेरणीला आला वेग कपाशीची २७.६४ टक्के टोबणसोयाबीनची २.४५ टक्के पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : यावर्षी पावसाने लवकरच दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. मृग नक्षत्राच्या जिल्ह्यात सर्वदूर सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर भर दिला आहे. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात असले तरीही शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन पेरणीला गती दिली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून कपाशीची २७.६४, सोयाबीनची २.४५ तर तुरीची ९.५८ टक्के लागवड पूर्ण झाली आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार लाख २८ हजार २१५ हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनने चांगलाच दगा दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये कपात केली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी एक लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची, तर दोन लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. परंतु यावर्षी कपाशीचा पेरा वाढविला असून, दोन लाख २७ हजार २५० हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे. एक लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन आहे. सध्या शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर जोर दिलेला दिसून येत आहे. आतापर्यंत ५६ हजार ५३८ हेक्टरवर कपाशी, सात हजार १४४ तूर, तर तीन हजार ८३५ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली आहे. काही शेतातमध्ये कपाशीचे पीक जमिनीबाहेर आले असून, डोलताना दिसत आहे. काळ्या जमिनीवर हिरवळ दाटायला लागली आहे. मृगधारांनी शेतशिवार हिरवेगार होत आहे.

पावसाची सुरु होताच जिल्ह्यात लागवडीला वेग आला आहे. आतापर्यंत कपाशीची २७.६४ तर सोयाबीनची २.४५ टक्के पेरणी आटोपली आहे. अजुनही पेरणीची लगबग सुरु असून शेतकऱ्यांनी कमीत-कमी १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय बियाणांची लागवड करू नये. हवामान खात्यानेही आता पावसात खंड पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी, टोबणी करावी अन्यथा नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी