शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मनोधैर्य योजनेला निधीचा खोडा

By admin | Updated: September 25, 2015 02:42 IST

लैंगिक अत्याचारग्रस्त बालक, अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी, बलात्काराच्या घटनेतील पीडितांना आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने मनोधैर्य योजनेची सुरूवात केली.

२० लाखांचा अनुशेष : निधीच्या मंजुरीची प्रतीक्षाश्रेया केने  वर्धालैंगिक अत्याचारग्रस्त बालक, अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी, बलात्काराच्या घटनेतील पीडितांना आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने मनोधैर्य योजनेची सुरूवात केली. या योजनेकरिता वर्ष २०१५-१६ करीता निधी प्राप्त झाला नसून २०१४-१५ वर्षातील मंजूर निधीपैकी २० लाख रूपयांचा अनुशेष आहे. यामुळे पीडितांना मदत घेण्यात अपुरा निधी ही बाब अडसर ठरत आहे. राज्य शासनाने २१ आॅक्टोंबर २०१३ ला मनोधैर्य योजनेबाबत शासन निर्णय जाहीर केला. यानुसार जिल्ह्यात २ आॅक्टोंबर २०१३ पासून घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेतील पीडित तसेच लैंगिक अत्याचाराग्रस्त बालक या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. योजनेची अंमलबजावणी आॅक्टोंबर २०१३ पासून राज्यभर करण्यात आली. जिल्ह्यातील २०१३-१४ तील पात्र पीडितांना आर्थिक मदत देण्यात आली. यानंतर २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षातील पीडितांना निधीअभावी मदत मिळू शकली नाही. जिल्हा मंडळाकडून पाठविण्यात आलेले मदतीचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहेत.मदतीचे स्वरूपराज्य सरकारने अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित, बलात्कार पीडित तसेच लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांचे पूनर्वसन करण्यासाठी ही योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली. पीडितांना वैद्यकीय उपचार, समुपदेशन यासाठी लागणार खर्च यासाठी १ ते ३ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते. तसेच अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिताला शल्यक्रियेसाठी ५० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाते.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना पोलीसात या संदर्भात प्रकरणे दाखल होताच ते मदतीच्या मंजुरीकरिता विचारात घ्यावे लागते. शिवाय ज्या पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल आहे तेथील तपास अधिकारी यांनी याची माहिती बालविकास अधिकारी यांना देणे गरजेचे असते. यानंतर सदर प्रकरण मदतीला पात्र आहे अथवा नाही निर्णय निर्णय जिल्हास्तरावरील समितीच्या सभेत घेतला जातो.या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे असते. पीडिताला मदत मिळवून देणे हे समितीचे कर्तव्य असते.