शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: May 30, 2016 01:44 IST

मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली.

अंतरगाव येथील घटना : गोठा जाळल्याने घडला अनर्थ
समुद्रपूर/गिरड : मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली. यामुळे चुलत भाऊ व त्यांच्या मुलाने संतापून या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याला उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील अंतरगाव येथे घडली. कवडू नारायण चाफले (४५) रा. अंतरगाव असे मृतकाचे नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्याचे नाव विठ्ठल चाफले, रामभाऊ चाफले व सचिन चाफले रा. अंतरगाव असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून विठ्ठल, रामभाऊ व सचिन चाफले या तिघांवर भादंविच्या कलम ३०२, २०१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गिरड पोलीस करीत आहेत.
पोलीस सुत्रानुसार, कवडू चाफले याच्याकडे १३ एकर शेती होती; पण त्याचे मानसिक संतुलन ठिक नसल्याने तो इतरांना त्रास देत होता. यामुळे गावात त्याची दहशत निर्माण झाली होती. त्याचा हाच त्रास पत्नी निर्मला हिला होत असल्याने गत तीन महिन्यांपासून ती मुलगी व मुलाला घेवून माहेरी हळदगाव येथे गेली होती. यामुळे गावात एकटाच राहत असल्याने त्याचा त्रास वाढला होता. अशात शेतातील त्याची जनावरे मृतावस्थेत दिसल्याने त्याने गावाला लागून असलेला त्याचा चुलत भाऊ विठ्ठल चाफले याच्या गोठ्याला आग लावली. या आगीत गोठ्यामधील स्प्रिंकलर पाईप सेट, इंजिनसह संपूर्ण शेती साहित्य खाक झाले. यात त्याचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
ही आग कवडूने लावल्याचे कळताच विठ्ठल, त्याचा भाऊ रामभाऊ, मुलगा सचिन व काही नागरिकांनी शोधून त्याला मारहाण केली. मारहाण करून त्याला गोठ्याजवळ आणले. घटनेची माहिती गिरड पोलिसांना मिळताच तेही घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी कवडूला त्वरित समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचा तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)

कवडूविरोधात आठवड्यापूर्वीच पोलिसांत तक्रार
कवडू चाफले याच्याकडून त्रास वाढत असल्याने त्याची तक्रार विठ्ठल चाफले याने आठ दिवसांपूर्वीच पोलिसांत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्यावर या प्रकरणी भादंविच्या ४३५ अन्वये गुन्हाही दाखल आहे. गावातील एक सद्गृहस्थ म्हणून विठ्ठलची ओळख असल्याचे गावकरी बोलत आहेत. कवडू मनोरुग्ण असून विठ्ठलच १५ वर्षांपासून त्याच्यावर औषधोपचार करीत असल्याची माहिती आहे.