शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीन बंदीचा उपचारादरम्यान मृत्यू

By admin | Updated: August 31, 2015 01:59 IST

दारू पिऊन आढळल्याने पोलिसांनी अटक करून न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा कारागृहात रवानगी झालेल्या न्यायाधीन बंदीचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. ..

दारू पिऊन धिंगाणा घातल्या प्रकरणी केली होती कारागृहात रवानगी वर्धा : दारू पिऊन आढळल्याने पोलिसांनी अटक करून न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा कारागृहात रवानगी झालेल्या न्यायाधीन बंदीचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. रामचंद्र मुते (४०) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातल्या प्रकरणी ११ आॅगस्ट रोजी शहर पोलिसांनी रामचंद्र मुते याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली. येथे असताना शनिवारी मध्यरात्री त्याची प्रकृती खालावली. याची माहिती कारागृह व्यवस्थापनास कळताच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची आरोग्य तपासणी करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा सकाळी त्याचा मृत्यू झाला. याची माहिती तहसीलदारांना देत त्याचा घटनास्थळीच पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती कारागृहातून देण्यात आली. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा अहवाल अद्याप प्राप्त होणे बाकी आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारण पुढे येईल असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे. मृतक रामचंद्र याला दारू पिऊन परिसरात धिंगाणा घालण्याच्या कारणावरून यापुर्वीही कारागृहात पाठविण्यात आले असल्याचे कारागृहातून सांगण्यात आले आहे. त्याला रोजच दारू पाहिजे असल्याने त्याची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज कारागृह व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)