शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन कोठडीतील दारूविक्रेत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

न्यायालयीन कोठडी भोगत असताना मंगळवारी दुपारी शंकरची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शंकरला सुरूवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसेवाग्राम येथील रुग्णालयात सुरू होता उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/अल्लीपूर : दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपीला अल्लीपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने सदर आरोपीची जामीन नाकारत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्या आरोपीची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली असून शंकर खुशाल चिंचोने, (३१) रा. कात्री असे मृतकाचे नाव आहे.अल्लीपूर पोलिसांनी कात्री येथील शंकर खुशाल चिंचोने याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर शंकर याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने आरोपी शंकर याचा जामिन फेटाळत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.न्यायालयीन कोठडी भोगत असताना मंगळवारी दुपारी शंकरची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शंकरला सुरूवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.शंकर खुशाल चिंचोने याच्याविरुद्ध यापूर्वीही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. नुकतीच त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याच गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडी भोगत होता.- योगेश कामाले, ठाणेदार, अल्लीपूर.

टॅग्स :Deathमृत्यू