शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरील ८८ गावांना पुराचा धोका

By admin | Updated: May 1, 2016 02:08 IST

जिल्ह्यात नदी काठावरील ८८ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असतो. शिवाय अन्य उपाययोजनाही कराव्या लागतात.

वर्धा : जिल्ह्यात नदी काठावरील ८८ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असतो. शिवाय अन्य उपाययोजनाही कराव्या लागतात. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नैसर्गिक आपत्ती तसेच मॉन्सून पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी नलावडे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागनिहाय जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या संकेत स्थळावरही तो उपलब्ध आहे. यात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी विभागनिहाय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच विभागांच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तालुकास्तरावर मान्सून पूर्व आढावा बैठकीतून नदी आणि नाल्यांमुळे बाधित होणाऱ्या गावांची माहिती घेऊन पूर परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत आराखडा तयार करावा, अशा सूचना करतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी या आराखड्यात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक व प्रमुख व्यक्तींची नावे असलेली दूरध्वनीसह यादी तयार करावी, नगर परिषदा व ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमधून धोकादायक इमारतींच्या मालकांना सूचना देण्यात यावी, नदी व नाल्यातील कचरा व गाळ काढण्याची मोहीम राबवावी, असेही सांगितले.जिल्ह्यात असलेल्या आरोग्य सुविधा आणि त्या अंतर्गत असणाऱ्या गावांची माहिती, मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठा याबाबत तसेच पूर नियंत्रणाबाबत आपतकालीन कृती आराखडा तयार करून जलाशयाची पातळी दररोज जिल्हा नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आली. पोलीस विभाग, जिल्हा दूरसंचार यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, होमगार्ड, जिल्हा परिषद, गटशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महामंडळ यांच्यातर्फे मान्सूनपूर्व तयारी संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.(कार्यालय प्रतिनिधी)