शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

आजनडोह येथे सिलिंडरचा भडका

By admin | Updated: November 1, 2016 01:51 IST

कारंजा (घाडगे) तालुक्यातील आजनडोह येथील रमधम यांच्या घरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिलिंडरचा

कन्नमवारग्राम : कारंजा (घाडगे) तालुक्यातील आजनडोह येथील रमधम यांच्या घरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिलिंडरचा चांगलाच भडका उडाला. शनिवारी झालेल्या या घटनेत घरातील तिघे गंभीर रित्या भाजल्या गेले. तर घरात बांधून असलेली एक बकरीही यात भाजल्या गेल्याने तिचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की, आजनडोह येथील जीवन गजानन रमधम यांच्या घरी दीपावली साठी ५ ते १० दिवसांपूर्वी सिलिंडर आणून ठेवले होते. घरातील सिलिंडर संपल्याने त्यांनी शनिवारी हे सिलिंडर लावण्याकरिता काढले; परंतु सिलिंडरचे झाकण काढताच त्यातून सू-सू असा आवाज येणे सुरू झाला. त्यामुळे सिलिंडर लिक आहे, बाहेर काढून पाहावे म्हणून घरातून सिलिंडर व शेगडी अंगणात आणली. त्या सिलिंडरला रेग्युलेटर लावण्याची तयार करीत असतानाच एकदम सिलिंंडरचा भडका उडाला. त्यामुळे बाजुला असलेला जीवन यांचा भाऊ सुनील रमधम, मुलगी अर्पीता सुनील रमधम (१४) व भाची हर्षला धनराज कामडी (१३) हे या भाजल्या गेले. या आगीमुळे घराच्या आवारात उभी असलेली दुचाकीही जळाली. तर एका चारचाकी वाहनाचेही या आगीमुळे नुकसान झाले. यात जीवित हानी झाली नसली तरी आगीमुळे भाजलेल्या बकरीचा मात्र मृत्यू झाला. जखमींना लगेच कन्नमवारग्राम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राज आणून उपचार केले. संबंधित एजन्सी धारकाला सुचना केल्यावर त्याने तातडीने कर्मचारी पाठविले. घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देवून सविस्तर माहिती घेतली. झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यावरून ग्रामीण भागात एजन्सी धारकांनी सिलिंडर योग्यप्रकारे तपासून घ्यावे व होणारे नुकसान टाळावे, अशी जनमानसात चर्चा आहे.(वार्ताहर)