शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांकांकरिता ग्राहकांची भटकंती

By admin | Updated: May 19, 2014 23:48 IST

तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावात तीन मुद्रांक विक्रेत्यांची (स्टॅम्प व्हेंडर) नियुक्ती करण्यात आली आहे. या मुद्रांक विके्रत्यांच्या परवान्याचे दरवर्षी नुतनीकरण केले जाते़

समुद्रपूर : तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावात तीन मुद्रांक विक्रेत्यांची (स्टॅम्प व्हेंडर) नियुक्ती करण्यात आली आहे. या मुद्रांक विके्रत्यांच्या परवान्याचे दरवर्षी नुतनीकरण केले जाते़ यानंतरच स्टॅम्प उचल व विक्री होते; पण येथील तीन व्हेंडरपैकी दोघांचे नुतनीकरण झाले तर एका महिला व्हेंडरच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात आले नाही़ यामुळे मुंद्रांकांचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ शहरात केवळ तीन मुद्रांक विके्रते असल्याने त्यांच्यावरच संपूर्ण नागरिक अवलंबून असतात़ यातील एक व्हेंडर मुद्रांकांची कमी उचल करतो़ यामुळे ते अल्पावधीतच संपतात तर दुसर्‍या व्हेंडरला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने ते स्वत:कडे अधिक मुद्रांक ठेवत नाहीत़ आता महिला व्हेंडरच्या परवान्याचे नुतनीकरण न झाल्याने एकच व्हेंडर राहिला़ यामुळे येथे मुद्रांक मिळणे कठीण झाले आहे़ शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांना मुद्रांकाकरिता त्रास सहन करावा लागत आहे़ आजपर्यंत समुद्रपूर तालुक्यात मुद्रांकाकरिता कधीही त्रास जाणवत नव्हता; पण एका व्हेंडरच्या परवान्याच्या नुतनीकरणात अडथळा आल्याने मुद्रांकांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे़ स्टॅम्पकरिता नागरिकांना ४ ते ५ तास रांगेत ताटकळावे लागत असल्याचे दिसून येते़ ग्राहकांनी तक्रार करणे अनिवार्य असले तरी त्यामागील हेतू कुठला, हे पडताळून पाहणे गरजेचे आहे. गरजवंतांना नेहमी स्टॅम्पसाठी भटकावे लागणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शासनाने समुद्रपूर या तालुक्याच्या ठिकाणी ठोस निर्णय घेऊन येथील गरजवंत स्टॅम्प ग्राहकांची भटकंती थांबवावी, अशी मागणी होत आहे़ सध्या पीक कर्जाकरिता शेतकर्‍यांना मुद्रकांची गरज भासत आहे. पूढे दहावी व बारावीचा निकाल लागणार असून विद्यार्थ्यांनाही स्टॅम्पची गरज भासेल़ याकडे लक्ष देत मुद्रांक उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)