शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या ‘बॅक वॉटर’मुळे पीक जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

शेत परिसराला तलावाचे रूप आले होते. शेतात तीन फूटापयंंत पाणी साचल्याने कपाशीचे संपूर्ण पीक नष्ट झाले. यामध्ये संबंधीत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे यशोदा नदी ते नांदोरा व ईसापूर परिसरातील भाग जलमय होवून पाण्याची पातळी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देनियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान : शासकीय अधिकाºयांचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक यशोदा नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील बॅकवॉटर शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतात तलाव सदृष परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तब्बल साडेचार एकरातील कपाशीचे पीक पूर्णत: नष्ट झाल्याने शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्याने खासदार रामदास तडस, तहसीलदार राजेश सरवदे यांना निवेदनातून केली आहे.स्थानिक यशोदा नदी व ईसापूर नदीच्या संगम पॉर्इंटवर देवळी येथील शेतकरी प्रकाश गोविंद फिसके यांचे साडेचार एकर शेत आहे. त्यांनी शेतात हंगामाच्या सुरूवातीलाच मोठ्या प्रमाणात खर्च करून कपाशी पिकाची लागवड केली. कपाशीचे पीक चांगले आले असताना तसेच डवरणी व खते देण्याची कामे पूर्णत्त्वात गेली असतानाच मंगळवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने नदीवरील बंधाऱ्याचे बॅकवॉटर शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने उभे पीक पाण्याखाली गेले. शेत परिसराला तलावाचे रूप आले होते. शेतात तीन फूटापयंंत पाणी साचल्याने कपाशीचे संपूर्ण पीक नष्ट झाले. यामध्ये संबंधीत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे यशोदा नदी ते नांदोरा व ईसापूर परिसरातील भाग जलमय होवून पाण्याची पातळी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, केंद्र शासनाच्या या कामात कोणतेही नियोजन नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यशोदा नदी व ईसापूर नदी पात्राचे खोलीकरण तसेच नदीच्या आजूबाजुला भरावा देण्याचे काम अजूनपर्यंत हाती घेण्यात न आल्यामुळे ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शासनस्तरीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.पाच कोटी खर्चून बंधारा निर्माणाधीनशासनाच्या केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत नाविन्यपूर्ण योजनेतून यशोदा नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. हा बंधारा सुमारे पाच कोटी रूपये खर्चून बांधण्यात येत असला तरी याकडे मात्र, शासनाचेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. देशस्तरावर बांधण्यात येत असलेल्या पाच बंधाऱ्यांपैकी हा एक बंधारा असल्याचे सांगितले जात आहे. पण, शासनाच्या नियोजनशुन्यतेचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बंधाऱ्यातील बॅकवॉटर शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती