शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी धावणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

जिल्ह्याच्या सीमा कोरोनाबाधित यवतमाळ, नागपूर व अमरावती जिल्ह्याला लागून आहे. या जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने संबंधित वाहनचालकांना विनवणी केली जात आहे. परंतु याचा काही एक फायदा होत नसल्याने कडक पाऊले उचलने गरजेच झाले आहे.

ठळक मुद्देअजय डवले : जिल्हा सीमाबंदीचे होतेय उल्लघंन; शिरपूर चेकपोस्टला भेट देत घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : कोरोना संक्रमणात शासनाने जिल्हाबंदी लागू केली असताना काही जण चोरमार्गाने वर्धा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी ही बाब अतिशय घातक असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी शिरपूर चेकपोस्टला भेट देत सीमाबंदीचा आढावा घेतला. यावेळी चेकपोस्टवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली. विनापरवानगी ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहन चालकासोबतच मोटारसायकल स्वारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे यावेळी सांगण्यात आले.जिल्ह्याच्या सीमा कोरोनाबाधित यवतमाळ, नागपूर व अमरावती जिल्ह्याला लागून आहे. या जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने संबंधित वाहनचालकांना विनवणी केली जात आहे. परंतु याचा काही एक फायदा होत नसल्याने कडक पाऊले उचलने गरजेच झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचेशी चर्चा करून विनापरवानगी चारचाकी वाहनासोबतच मोटारसायकल चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे डॉ. डवले यांनी सांगितले. काही परप्रांतीय मजूर वर्धा जिल्ह्याची सीमा ओलांडून पायदळ आपल्या राज्यात जात आहे. ही बाब कोरोना आजाराचे संक्रमणासाठी घातक असल्याची गोष्ट आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डवले यांचे कानी घातली. यावेळी जिल्हा सीमेवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी डॉ. डवले यांनी केले. सीमाबंदी पाहणी पथकात जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण धमाने, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय दाढे, डॉ. कोमल कठाणे, शेख हुसेन, प्रमोद घुडे, शरद डांगरे, माधव कातकडे, गणेश चंदेल व विकास माणीकुकडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस