शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’ने कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

देवकांत चिचाटे। लोकमत न्यूज नेटवर्क नाचणगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन अन् लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून सर्वच केंद्रावरील सीसीआयची कापूस खरेदी ठप्प पडली ...

ठळक मुद्देमंगळवारपासून प्रारंभ : दररोज घेणार २० गाड्या, शेतकऱ्यांना दिलासा

देवकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन अन् लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून सर्वच केंद्रावरील सीसीआयची कापूस खरेदी ठप्प पडली होती. यामुळे खरिप हंगामाच्या तोंडवर शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. मंगळवारपासून पुलगाव येथील केंद्रावर सीसीआय अंतर्गत महाकॉटची कापूस खरेदी सुरु करण्यात आली आहे. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.सीसीआयच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना हमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून सर्व कापूस खरेदी केंद्र लॉकडाऊन झाल्याने शेतकऱ्यांकडे ३० ते ४० कापूस शिल्लक राहिला. दीड महिन्यानंतर खरीप हंगाम सुरु असल्याने त्याच्या तयारीकरिता शेतकऱ्यांना पैशीची गरज आहे. कापसाच्या विक्रीअभावी शेतकऱ्यांच्या हातातही पैसा नव्हता. त्यामुळे लवकरात लवकर कापूस खरेदी सुरु व्हावी, याची प्रतीक्षा होती. मंगळवारी पुलगाव येथील संत गजानन माऊली या केंद्रावर कापसाची खरेदी सुरु केली आहे.उन्हाळा वाढत असल्याने कापसाच्या वजनात घट होत आहे. आणखी काही काळ खरेदी बंद असती तर शेतकºयांना मोठा फटका बसला असता पण, आता खरेदी सुरु केल्याने दिलासा मिळाला आहे.केंद्रावर अशी घेतली जाते खबरदारीकोरोनाचे संकट कायम असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार खरेदी केंद्रावर खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची नोंदणी केली असून नोंदणीप्रमाणे आदल्या दिवशी फोन करुन दुसऱ्या दिवशी गाड्या बोलावल्या जात आहे. गर्दी टाळण्यासाठी दररोज वीस गाड्या बोलाविल्या जात असून एक गाडी आत गेल्यावर गाडीसह वाहन चालक व सहकाऱ्याचे सॅनिटायझेशन करतात. त्यानंतर वजन केल्यानंतर कापूस खाली करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध लावण्यासोबतच शेतकºयांचेही समाधान होत आहे.बाजार समिती ठरलीय दुवाकापूस खरेदी केंद्रावर गर्दी होवू नये म्हणून पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये नोंद केलेल्या शेतकऱ्यांना क्रमाक्रमाने बोलावित आहे. त्यानंतर बाजार समितीतून टोकण दिल्यानंतर अग्रक्रमाने सीसीआयच्या संबंधीत कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी न्यावा लागतो. कापूस उत्पादक शेतकरी व खरेदीधारक सीसीआय या दोघांमधील दुवा म्हणून बाजार समिती कार्य करीत आहे. त्यामुळे खरेदी केद्रावरील शेतकऱ्यांची गर्दीही कमी झाल्याचे दिसून येत आहे.लॉकडाऊननंतरच्या महिनाभरानंतर मंगळवारपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरु झाली आहे. प्रथम शेतकऱ्यांची नोंदणी केल्यानंतरच नोंदणीनुसार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्या जात आहे. जुन्या नोंदणीधारक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्यानंतरच नवीन नोंदणी सुरु केली जाईल.मनोहर खडसे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव.

टॅग्स :cottonकापूसcorona virusकोरोना वायरस बातम्या