शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात मिळेल मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने शेतकरी हित लक्षात घेऊन धाम प्रकल्पातून आतापर्यंत एकूण ३२.०२ दलघमी पाणी सिंचनासाठी सोडले आहे. तर प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. एकूणच वर्धा पाटबंधारे विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे यंदा वर्धा तसेच वर्धा शहराशेजारील गावांमधील नागरिकांना कोरोनाच्या संकटातही उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळणार आहे.

ठळक मुद्देशुभवार्ता : ‘धाम’ प्रकल्पात ४५.३६ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरातील १७ हजार तर वर्धा शहराशेजारील १८ हजार कुटुंबीयांच्या तृष्णातृप्तीसाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प उपयुक्त ठरतो. पण, गत वर्षी याच प्रकल्पाने उन्हाळ्याच्या सुरूवातीला तळ गाठल्याने वर्धेकरांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. असे असले तरी यंदाच्या वर्षी या प्रकल्पात सध्यास्थितीत ४५.३६ टक्के जलसाठा असल्याने आणि वर्धा पाटबंधारे या उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन केल्याने कोरोनाच्या संकटातही वर्धेकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.प्राप्त माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिली. परंतु, नंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे धाम प्रकल्प १०० टक्के भरला. धाम प्रकल्पाची एकूण जीवंत पाणी साठवण क्षमता ५९.४८५ दलघमी आहे. या प्रकल्पाद्वारे ९ हजार ५०० हेक्टरवरील शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी दिले जाते. आतापर्यंत वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने महाकाळी येथील धाम प्रकल्पातून चार वेळा सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे.वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने शेतकरी हित लक्षात घेऊन धाम प्रकल्पातून आतापर्यंत एकूण ३२.०२ दलघमी पाणी सिंचनासाठी सोडले आहे. तर प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. एकूणच वर्धा पाटबंधारे विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे यंदा वर्धा तसेच वर्धा शहराशेजारील गावांमधील नागरिकांना कोरोनाच्या संकटातही उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळणार आहे.गतवर्षी होता केवळ ६.२४ दलघमी जलसाठागत वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्धेकरांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले होते. इतकेच नव्हे तर वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने तब्बल आठ दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात होता. गत वर्षी २४ एप्रिलला धाम प्रकल्पात केवळ ६.२४ दलघमी इतकाच जीवंत जलसाठा होता. तर सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात २६.९८ दलघमी जीवंत जलसाठा आहे.या आहेत पाणी वापर संस्थाधाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा नगरपालिका, एम.आय.डी.सी. वर्धा, मध्य रेल्वे वर्धा, उत्तम व्हल्यू स्टील लि. भूगाव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा, ग्रा.पं. आंजी (मो.), ग्रा.पं. पवनार तसेच जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड इफ्रास्ट्रक्चर लि. करते. वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही पाणी वापर संस्था धाम नदी पात्रातून पाण्याची उचल करून त्या पाण्याचा पुरवठा अनुक्रमे शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबीयांना करते.

टॅग्स :Waterपाणी