पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:11+5:30

समुद्रपूर येथील ४१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती ठिक नसल्याने तो ३० जुलैपासून प्राथमिक उपचार घेत होता. दरम्यान कोरोनाची लक्षणे त्यात दिसून आल्यावर कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. पोलीस कर्मचारी कोरोना बाधित निघाल्याने पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे.

Corona infection to a police officer | पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग

पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग

Next
ठळक मुद्देसमुद्रपूर शहरात खळबळ : कोरोना बाधितांची संख्या झाली चार

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : येथील ४१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने समुद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी केले आहे.
समुद्रपूर येथील ४१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती ठिक नसल्याने तो ३० जुलैपासून प्राथमिक उपचार घेत होता. दरम्यान कोरोनाची लक्षणे त्यात दिसून आल्यावर कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. पोलीस कर्मचारी कोरोना बाधित निघाल्याने पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे. या कोरोना बाधिताच्या निकट संपर्कात आलेल्या दहा व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मधील काही परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे. यापूर्वी तालुक्यात तीन कोरोना बाधित सापडले आहेत. तर आज नवीन रुग्ण आढळल्याने तालुक्याची रुग्ण संख्या चार झाली आहे. कंटेन्मेंट झोनची पाहणी एसडीपीओ भीमराव टेळे, नगराध्यक्ष गजानन राऊत, ठाणेदार हेमंत चांदेवार, तहसीलदार किरसाण, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भगत आदींनी केली.

Web Title: Corona infection to a police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.