शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधकामाच्या स्वप्नाला कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून वास्तव्यास असलेल्यांचे वादळी पावसाच्या तडाख्याने शेड उडून जात असल्याने धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. काहींच्या शेडची पडझड होत आहे. संचारबंदी व मजुरांअभावी विटा निर्मीतीचे कारखानेही बंद आहे. पावसामुळे कच्चा विटा विरघळल्याने वीट निर्मितीस वेळ लागणार आहे. त्यामुळे यावर्षी घर निर्माण होईल की, नाही अशी शंका घर बांधकाम करणाºयांना भेडसावत आहे.

ठळक मुद्देकुटुंबियांमध्ये चिंता। शेड उभारुन उदरनिर्वाह सुरू मजूर कामावर येण्यास तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपोहणा : परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांनी जुने जीर्ण झालेले घर पाडून नवीन बांधकाम करण्यास सुरूवात केली आहे. त्यापूर्वी निवास व्यवस्था म्हणून अनेकांनी तात्पुरते शेड उभारले. पण, आठ दिवसांपासून वादळी पावसाने कहर केल्याने टिनाचे छप्पर उडत असून अनेकांचे घराची पडझड झाली आहे. तसेच संचारबंदी लागल्याने घर बांधकामाकरीताच्या साहित्याची आयात बंद झाल्याने घराचे स्वप्न पूर्ण कधी होणार, याच चिंतेत नागरिक आहे. शेड उभारून धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या वीटा, वाळू आदी साहित्याची आयात बंद आहे. मजुरवर्ग कामावर येत नसल्याने घर बांधकाम करणाऱ्यांसमोर घराचे काम पूर्ण करणे हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून वास्तव्यास असलेल्यांचे वादळी पावसाच्या तडाख्याने शेड उडून जात असल्याने धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. काहींच्या शेडची पडझड होत आहे. संचारबंदी व मजुरांअभावी विटा निर्मीतीचे कारखानेही बंद आहे. पावसामुळे कच्चा विटा विरघळल्याने वीट निर्मितीस वेळ लागणार आहे. त्यामुळे यावर्षी घर निर्माण होईल की, नाही अशी शंका घर बांधकाम करणाऱ्यांना भेडसावत आहे.तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शेडमध्ये संपूर्ण कूटूंब आपल्या निवाऱ्याची सोय करून लवकरात लवकर घर उभे होईल व त्यात प्रवेश करू अशी आशा अनेकांच्या मनात होती. पण, पावसाळाच्या दिवसात या अपुऱ्या व धोकादायक शेडमधेच जीवन जगावे लागणार असल्याने त्यांच्यासमोर मोठ प्रश्न उभा ठाकला आहे.विट निर्मितीवर ही परिणाम बांधकामे थांबली'मार्च, एप्रिल महिन्यात बांधकामे केली जातात. यंदा नागरिकांनी ग्रामीण भागात घर, शेतातील गोठे यांचे बांधकाम सुरू केले होते. पंरतु मार्च महिन्यात कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली यांचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. विटा, रेती, सिंमेट, लोखंड हे साहित्य मिळणे बंद झाल्याने बांधकामे ठप्प पडली आहे. या कामांसाठी मजूरही मिळत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.