शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना मृत्युसंख्येने ओलांडली हजारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

देशभरासह राज्यात गतवर्षीपासून कारोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा ९ मेपर्यंत काेरोनामुक्त होता. १० मे रोजी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर सातत्याने काेरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत गेली. चाचण्यांची गती मंदावल्याने सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात होती.

ठळक मुद्देसंकट दिवसेंदिवस गडद : शहरासह ग्रामीण भागात बाधितांचा आकडा गाठतोय दररोज नवा उच्चांक

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले असून, दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे. एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मृत्युसंख्येने हजारी ओलांडल्याचे दिसून येत आहे.देशभरासह राज्यात गतवर्षीपासून कारोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा ९ मेपर्यंत काेरोनामुक्त होता. १० मे रोजी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर सातत्याने काेरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत गेली. चाचण्यांची गती मंदावल्याने सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात होती.  यावर्षी मार्च महिन्यापासून काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले. कोरोनाचे संकट आणखी गडद झाले. चाचणीसाठी आतापर्यंत ३ लाखांवर स्त्राव नमुने पाठविण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या  ४१ हजार ७२९ वर पोहोचली असून, पूर्वी एक अंकी असणारी मृत्युसंख्या आता दोन अंकी झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ६ हजार ८७७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रदिनी १ मे रोजी तब्बल १,१४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. २ मे रोजी ८२२, ३ मे रोजी ३००, ४ मे रोजी ६३०, ५ मे रोजी ९६३, ६ मे रोजी ९०५, ७ मे रोजी ७६६, ८ मे रोजी ९९४ रुग्ण आढळूून आले, तर कोरोना मृत्युसंख्येने हजारचा पल्ला ओलांडला आहे. 

त्रिसूत्रीचे कोटेकोरपणे पालन गरजेचेकोरोनाने शहरातच नव्हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आता पाळेमुळे रुजविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, वर्षभरात १ हजार जणांचा काेरोनाने बळी घेतला आहे. संकट आणखी गडद होत असल्याने कारोना प्रतिबंधात्मक नियमांचे नागरिकांनी आता काटेकोरपणे पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू