गॅस सिलिंडरकरिता इण्डेनसमोर ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:09+5:30

इंडियन ऑईल कंपनीकडे सराफ इण्डेन गॅस एजंन्सीचे १३ लाख ५५ हजार ४५० रुपये जमा आहे. परंतु, एजन्सीकडून फिल्ड आफीसर निलेश ठाकरे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यामुळे या बदल्यातून सिलिंडरचा पुरवठा रोखून ग्राहकांच्या भावनाशी खेळ चालविला. अखेर ग्राहकांना तत्काळ सिलिंडर उपलब्ध करुन देण्याची मागणी कंपनीकडे केल्यानंतर कंपनीकडून सिलिंडर पुरवठा होताच ग्राहकांना सिलिंडर वितरीत करण्यात आले.

Consumers flock to Inden for a gas cylinder | गॅस सिलिंडरकरिता इण्डेनसमोर ग्राहकांची झुंबड

गॅस सिलिंडरकरिता इण्डेनसमोर ग्राहकांची झुंबड

Next
ठळक मुद्देसामाजिक अंतराने झाले वितरण : कंपनीच्या अटकावामुळे ओढवली परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता शासनाकडून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरु ठेवण्यास सांगितले आहे. मात्र काही दिवसांपासून ग्राहकांना सिलिंडरचा पुरवठा झाला नसल्याने शुक्रवारी सकाळी शहरातील सराफ इण्डेन गॅस एजंन्सीपुढे सिलिंडर घेण्याकरिता ग्राहकांची झुंबड झाली होती. पोलिसांनी मध्यस्तीकरुन सामाजिक अंतराने सिलिंडरचा वाटप करण्यात आला.
शहरात इण्डेन गॅसचे मोठे ग्राहक आहे. ग्राहकांना नियमित गॅस सिलिंडर पुरविण्याचे कार्य सराफ इण्डेन कडून केले जाते. लॉकडाऊनच्या काळात उपलब्ध असलेले सिंलिंडर शहरातील ग्राहकांना घरपोच पुरविण्यात आले. मात्र, सराफ इण्डेनकडून फिल्ड ऑफीसरची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी बदल्याची भूमिका ठेऊन इडियन ऑईल कंपनीकडून एजंन्सीला सिलिंडरचा पुरवठा केला नाही. त्यामुळे एजंन्सीकडे सिलिंडर उपलब्ध नसल्याने या अडचणीच्या काळात ग्राहकांना सिलिंडर पुरविण्यात अडचणी निर्माण झाल्या. शेवटी एजंन्सीचालकाने कंपनीला येथील परिस्थिती अवगत केल्यानंतर कंपनीकडून सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. शुक्रवारी सकाळपासूनच ग्राहकांनी सिलिंडर घेण्याकरिता गर्दी केली होती. ही गर्दी टाळण्याकरिता शहर पोलिसांनी धाव घेत शहरातील ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना पुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे एजंन्सीकडून त्याला सहकार्य करीत ग्रामीण भागातील ग्राहकांना सामाजिक अंतराने सिलिंडरचे वाटप केले. तसेच शहरातील ग्राहकांना सिलिंडेर पोहोचविण्याकरिता वाहने पाठविण्यात आली होती.

इंडियन ऑईल कंपनीकडे सराफ इण्डेन गॅस एजंन्सीचे १३ लाख ५५ हजार ४५० रुपये जमा आहे. परंतु, एजन्सीकडून फिल्ड आफीसर निलेश ठाकरे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यामुळे या बदल्यातून सिलिंडरचा पुरवठा रोखून ग्राहकांच्या भावनाशी खेळ चालविला. अखेर ग्राहकांना तत्काळ सिलिंडर उपलब्ध करुन देण्याची मागणी कंपनीकडे केल्यानंतर कंपनीकडून सिलिंडर पुरवठा होताच ग्राहकांना सिलिंडर वितरीत करण्यात आले. शहरातील ग्राहकांनाही तत्काळ घरापोच सेवा सुरु केली आहे.
- शरद सराफ, संचालक, इण्डेन गॅस एजंन्सी.

Web Title: Consumers flock to Inden for a gas cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.