ग्राहकांची आठवडी बाजारात चाकोरीबद्ध देवाण-घेवाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:12+5:30

बाजारातील वेगवेगळ्या ओट्यावर भाजीपाला, फळे, धान्य व इतर वस्तुंची खरेदी करीत असताना ग्राहकांना विशिष्ट अंतर ठेवून उभे ठेवण्यात आले. यावेळी विक्रेते व ग्राहक या दोघांनाही मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचे व सुचनांचे पालन करण्यासाठी ध्वनीक्षेपणावरुन वेळोवेळी आवाहन करण्यात आले. नागरिकांनी सुद्धा या नियमांना प्रतिसाद देवून खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण केले.

Consumer reciprocity Weekend Marketplace | ग्राहकांची आठवडी बाजारात चाकोरीबद्ध देवाण-घेवाण

ग्राहकांची आठवडी बाजारात चाकोरीबद्ध देवाण-घेवाण

Next
ठळक मुद्देनगर पालिकेचे उत्कृष्ट नियोजन । सोशल डिस्टन्सिंगचा प्रयोग यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : शुक्रवारला देवळीचा आठवडी बाजार असल्याने या दिवशी जमावबंदीचे सर्व नियम पाळून ग्राहकांनी देवाण-घेवाण केली. न.प.च्यावतीने बाजाराचे अतिशय चाकोरीबद्ध नियोजन करण्यात आले. दर्शनी भागातील बाजार परिसराला लोखंडी पाईपचे कुंपन टाकुन ग्राहकांना आत जाण्यासाठी एकच मार्ग ठेवण्यात आला. या मार्गावर सोशल डिस्टंटसिंगच्या अंतरावर चौकोनी डब्बे आखून ग्राहकांची रांग लावण्यात आली. गेटवर ग्राहकांच्या हात धुण्याची व्यवस्था करुन त्यांना आत सोडण्यात आले. बाजारातील वेगवेगळ्या ओट्यावर भाजीपाला, फळे, धान्य व इतर वस्तुंची खरेदी करीत असताना ग्राहकांना विशिष्ट अंतर ठेवून उभे ठेवण्यात आले.
यावेळी विक्रेते व ग्राहक या दोघांनाही मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचे व सुचनांचे पालन करण्यासाठी ध्वनीक्षेपणावरुन वेळोवेळी आवाहन करण्यात आले. नागरिकांनी सुद्धा या नियमांना प्रतिसाद देवून खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण केले.
नियोजनासाठी न.प. मुख्याधिकारी अंकुश जाधव, प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, कर अधिकारी देवेंद्र निकोसे, संगणक अभियंता ज्ञानेश्वर जाधव, आरोग्य निरीक्षक सुनील पुरी, उत्तम कामडी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे पालिकेची अनेकांनी प्रशंसा केली.

Web Title: Consumer reciprocity Weekend Marketplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार