शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य समायोजनामुळे गोंधळ

By admin | Updated: September 18, 2014 23:40 IST

विविध प्रकारची कार्यकुशलता प्रदर्शित करण्याचा हातखंडा असलेल्या जि.प. शिक्षण विभागांतर्गत पं.स. समुद्रपूर शिक्षण विभागाने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या

समुद्रपूर : विविध प्रकारची कार्यकुशलता प्रदर्शित करण्याचा हातखंडा असलेल्या जि.प. शिक्षण विभागांतर्गत पं.स. समुद्रपूर शिक्षण विभागाने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या समायोजनाचा डोलारा उभा करून पुन्हा एकदा गोंधळ घातला आहे़ राज्यात राजाच चोरी करीत असेल तर प्रजा न्याय कुणाकडे व कशासाठी मागणार, याचा प्रत्यय नियमबाह्य समायोजनाने पं.स. अंतर्गत कार्यरत शिक्षकांना आला आहे़आरटीई अंतर्गत केलेल्या विषय शिक्षकांच्या पदस्थापनेमुळे तालुक्यातील अनेक शाळांत शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ जेथे शिक्षक संख्या कमी आहे, तेथे सदर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावयाचे होते. या समायोजनासाठी १२ मे २०११ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावयाचे होते; पण पं.स. समुद्रपूर अंतर्गत समायोजन करताना १४ आॅगस्ट रोजी झालेल्या मासिक सभेत केंद्रप्रमुखांना समायोजन करण्याची परवानगी गटशिक्षणाधिकारी देऊन काही समायोजन केले. उर्वरित शिक्षकांचे समायोजन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत:च्या स्वाक्षरी आदेशाने ३ आॅगस्ट २०१४ रोजी केले. या प्रक्रियेमध्ये १२ मे २०११ च्या शासन निर्णयाची पायमल्ली स्थानिक प्रशासनाने केली. नियमबाह्य प्रक्रियेवर शिक्षकांनी आक्षेप घेतला़ यावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांद्वारे सर्व प्रक्रिया मनोमनी रद्द करून पुन्हा नव्याने ८ सप्टेंबर २०१४ रोजी पंचायत समिती कार्यालयात बोलवून समुपदेशन घेण्यात आले. यातील प्रसिद्ध यादीही वास्तव्य कनिष्ठ क्रमाची लावण्यात आली. सदर प्रसिद्ध यादी चुकीची असल्यामुळे शिक्षकांनी पुन्हा आक्षेप घेतला आणि शासन निर्णयातील कलम ३, ५ व ६ (एफ) मधील निर्देशित नियमाप्रमाणे तालुका वास्तव ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून त्याच क्रमाने समायोजन करण्यात यावपे, अशी आग्रही मागणी केली आहे़ शिक्षकांनी आक्षेप घेतल्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेली यादी पुन्हा रद्द केली; पण शासन निर्णयाला बाजूला सारत वास्तव्य सेवा कनिष्ठतेचा क्रम लावूनच समायोजनाचे समुदपदेशन घेण्यात आले़ एकंदरीत स्व-मर्जीने केलेल्या या प्रक्रियेत काही हितसंबंधातील कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकारी करीत असल्याचा आरोप उपस्थित शिक्षकांनी केला आहे़ सदर प्रक्रिया नियमबाह्य असून केलेले तात्पुरते समायोजन तवरित रद्द करावी, अशी मागणीही शिक्षकांनी केली आहे़ याबाबतची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती समुद्रपूरने जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्याकडे केली आहे़यापूर्वीही जिल्हा परिषद प्रशासनाने मे २०१२, नोव्हेंबर २०१२, आणि आॅक्टोबर २०१३ मध्ये केलेले समायोजन हे १२मे २०११ च्या शासन निर्णयानुसार वास्तव्य सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात आले होते, हे विशेष! असे असताना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने समायोजन केल्याने असंतोष पसरला आहे़ यामुळे शिक्षकांनी तक्रार केली असून सदर समायोजन रद्द होते वा या प्रक्रियेवर जि.प. वर्धा प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)