शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

रेडझोनमधून येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

वर्धा जिल्ह्याच्या सर्व सिमेला लागून असलेल्या यवतमाळ, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कायम आहे. लॉकडाऊनमुळे मार्च महिण्यापासून आपआपल्या जिल्ह्यात अडकलेले बँकेचे अधिकारी कर्मचारी त्याच ठिकाणावरून वर्क फ्रॉमहोम करीत आहेत. तर तेथील स्थानिक शाखेत जावून वरिष्ठांच्या आदेशांनी अनेकांनी कामेही केली.

ठळक मुद्देबँकामध्ये गर्दी वाढली : खातेदार आणि सहकारी कर्मचारी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जिल्हा प्रशासनाने चांगले यश मिळविले आहे. यासाठी वेळीच अनेक उपाययोजना लागू केल्यामुळे हे शक्य होऊ शकले. मात्र २५ मे रोजी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामुळे रेडझोनच्या जिल्ह्यातूनही बँक कर्मचारी आता वर्धा जिल्ह्यात बँकेत कामावर रूजू होऊ लागले आहे. त्यामुळे बँकेतील गर्दीत उभे राहणारे ग्राहक व त्यांचे सहकारी कर्मचारी धास्तावलेले आहेत.वर्धा जिल्ह्याच्या सर्व सिमेला लागून असलेल्या यवतमाळ, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कायम आहे. लॉकडाऊनमुळे मार्च महिण्यापासून आपआपल्या जिल्ह्यात अडकलेले बँकेचे अधिकारी कर्मचारी त्याच ठिकाणावरून वर्क फ्रॉमहोम करीत आहेत. तर तेथील स्थानिक शाखेत जावून वरिष्ठांच्या आदेशांनी अनेकांनी कामेही केली. वर्धा जिल्ह्यात अनेक बँकामध्ये यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी तेथे कन्टेनमेंट झोन तयार झाल्याने येवू शकले नव्हते. मात्र २५ मे रोजी निघालेल्या आदेशाच्या आधारे आता हे कर्मचारी आपल्या शाखांमध्ये रेडझोन जिल्ह्यातून दाखल होत आहे. त्यामुळे बँकेच्या या गर्दीत कोरोनाच्या सावटात काम करणे त्यांच्या सहकाऱ्यांनाही भितीदायक ठरत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेच्या वेळाही जिल्हा प्रशासनाने बदलविलेल्या असून आता सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत बँकेचे काम चालणार आहे. कर्मचारी स्वत: कोरोना बचावासाठी विविध साधणे वापरत आहे. मात्र येणारा प्रत्येक ग्राहक याची दक्षता घेईलच अशी स्थिती नाही. त्यामुळे बॅक कर्मचारी धास्तावले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या