शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाकाठी पालिकेला सरासरी ६.१६ लाखांचा सफाई कर

By admin | Updated: June 13, 2014 00:21 IST

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता पालिकेच्यावतीने शहरवासीयांकडून सफाई कर वसूल केले जाते. या करापोटी पालिकेला वर्षाकाठी सरासरी ६.१६ लाख रुपये शहरातून मिळतात. असे असले तरी शहरातील

रूपेश खैरी - वर्धाशहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता पालिकेच्यावतीने शहरवासीयांकडून सफाई कर वसूल केले जाते. या करापोटी पालिकेला वर्षाकाठी सरासरी ६.१६ लाख रुपये शहरातून मिळतात. असे असले तरी शहरातील रस्त्यारस्त्यावर कचऱ्यांची आरास दिसत असल्याने स्वछतेचे वाभाडे निघत आहे.

शहरातील नागरिकांना मूलभूत सविधा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. ही जबाबदारी पार पाडण्याकरिता पालिकेला आवश्यक असलेली रक्कम मिळविण्याकरिता शहरवासीयांकडून कर वसूल करण्यात येतो. हा कर वसूल करताना शासनाच्या सूचनेनुसार विविध शाखा तयार करून त्या माध्यमातून कर वसूल केला जात आहे. पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असलेल्या करापैकी बरीच रक्कम पालिकेला मिळत नसून ती थेट शासनाच्या तिजोरीत जात असल्याचे समोर आले आहे; मात्र सफाई कराचे तसे नाही. वसूल झालेल्या सफाई करावर पालिकेचा अधिकार आहे.

शहरवासीयांकडून वर्षाकाठी वसूल होत असलेल्या कराच्या रकमेतून शहरात स्वच्ठता ठेवण्यात येत आहे. गत आठ वर्षांत शहरातून पालिकेच्यावतीने ४९ लाख ३१ हजार ३९० रुपयांचा कर वसूल करण्यात आला असल्याचे माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अधिकाराचा वापर करून समोर आणले आहे. एवढा कर वसूल करण्यात आला असला तरी पालिकेच्यावतीने स्वच्छतेच्या नावावर शहरवासीयांना कुठल्याही ठोस सुविधा दिल्या नसल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्त्यारस्त्याचर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यातून दुर्गंधी पसरत असून त्याचा विपरित परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय डासांचे प्रमाण वाढल्याने शहरात डेंग्यूची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पावसाळा तोंडावर आला आहे. शहरातील नाल्या कचऱ्याने तुुंबल्या आहेत. पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहे. ती शहरातील बाजार परिसरातच असून शहराच्या इतर भागात मात्र या मोहिमेचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागातील नाल्या अजूनही तुंबलेल्या स्थितीत असून त्या स्वच्छ करण्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात या नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर त्याचे सोयरे सुतक पालिकेला नसल्याचे वास्तव असल्याचे चित्र आहे. वर्षाकाठी सहा लाखांचा कर देणाऱ्या वर्धा शहर वासींयाच्या माथी घरात पाणी जाण्याची वेळ आल्यास त्यांनी दिलेला हा कर त्यांच्या काय उपयोगाचा, असा प्रश्न पालिकेच्या कर वसुली पथकाला नागरिकांनी विचारल्यास आश्चर्य वाटू नये.