शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलीस ठाण्याकडून कर बुडवेगिरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

रामनगर पोलिस ठाण्याने भाड्यापोटी नगरपालिकेचे नऊ लाख रुपये थकविले. तीन वर्षांपासून करार करण्याकडेही पोलीस अधीक्षक कार्यालयाने दुर्लक्ष केले. कराराअभावी मालमत्ता नावेच झाली नसताना रामनगर पोलीस ठाण्याने आवारातच अनधिकृतपणे बांधकाम करीत कायद्याच्या रक्षणकर्त्यांनीच कायदा हातात घेतला.

ठळक मुद्देकायद्याच्या रक्षणकर्त्यांकडूनच बेकायदेशीर कृत्य । पोलीस अधीक्षक कार्यालयाच्याही डुलक्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रीद असलेल्या पोलिस विभागाच्या शहर ठाण्याने, पर्यायाने पोलीस अधीक्षक कार्यालयाने मागील पाच वर्षांपासूनच मालमत्ता कराचा भरणाच केला नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मरणपत्रे देऊन नगरपालिकेचा कर विभागदेखील हतबल झाला आहे.रामनगर पोलिस ठाण्याने भाड्यापोटी नगरपालिकेचे नऊ लाख रुपये थकविले. तीन वर्षांपासून करार करण्याकडेही पोलीस अधीक्षक कार्यालयाने दुर्लक्ष केले. कराराअभावी मालमत्ता नावेच झाली नसताना रामनगर पोलीस ठाण्याने आवारातच अनधिकृतपणे बांधकाम करीत कायद्याच्या रक्षणकर्त्यांनीच कायदा हातात घेतला. कराराअभावी रामनगर ठाण्याकडेही ३ लाख १८ हजार रुपये कर थकीत आहे. याच पाठोपाठ शहर पोलीस ठाण्याकडूनही कराचा नियमित भरणा केला जात नसल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय डुलक्या घेत असल्याचे चित्र आहे.शहर पोलीस ठाण्याची चार ते पाच वर्षांपासून पाणी आणि मालमत्तेपोटी थकीत ही रक्कम आता ४ लाख ६१ हजार २३१ रुपयांवर पोहोचली आहे. शहरात सर्वसामान्यांनी कराचा वेळेत भरणा न केल्यास नगरपालिकेकडून नळजोडणी, वीज वितरण कंपनीला पत्र देऊन वीजपुरवठा खंडित करणे, प्रसंगी मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाते.सर्वसामान्यांना धाकदपट करण्यात पालिकेचा कर विभाग सदैवच अग्रेसर असतो. पोलीस ठाण्यावर कारवाईचे मात्र, नगरपालिकेच्या कर विभागाने धाडस दाखविले नाही.शहर पोलीस ठाण्याने पाच वर्षांपासून पावणे पाच लाखांवर रक्कम थकविली. नगरपालिका प्रशासनाकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाला वेळोवेळी स्मरणपत्रे दिली जात असताना या विभागाकडूनही शून्य प्रतिसाद आहे. दरवर्षी कर विभागाकडून कराचा तपशील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला जातो. मात्र, वरिष्ठांचा वचकच नसल्याने पालिकेला ही रक्कम देण्यात अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. पोलीस ठाण्याकडूनच कराचा भरणा न करता बेकायदेशीर कृत्य केले जात असल्याने जिल्हा प्रशासन यात काय भूमिका घेते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. शासनाचा एक विभाग शासनाचाच महसूल बुडविण्याच्या मागे लागला की काय, अशा शंका-कुशंका नगरपालिकेच्या वर्तुळातून व्यक्त केल्या जात आहेत.कारवाईतील पक्षपातपालिकेच्या कर विभागाकडे ठाण्यावर काय कारवाई करणार, अशी विचारणा केली असता ठाणे प्रशासनाला प्रथम नोटीस देऊ, शिवाय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कारवाईचे आदेश निर्गमित करण्याबाबत विनंती करणार असल्याचे सांगितले. सर्वसामान्यांनी महिनाभराचा कर थकविला तर पालिकेकडून थेट कारवाईचा बडगा उगारला जातो. पोलीस ठाण्याकडून कराचा भरणा केला जात नसताना कारवाई केली जात नाही. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची गरज भासते. त्यामुळे जिल्हा-नगर प्रशासन कारवाईत कसा दुजाभाव करते, हे उघड झाले आहे.

टॅग्स :Policeपोलिस