शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटावमुळे शहर मोकळे

By admin | Updated: January 29, 2015 23:11 IST

शहरातील अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्यीकरण धोक्यात आले होते. यामुळे उच्च न्यायालयाचे आदेश व राज्य शासनाच्या निर्देशामुळे शहरात २८ ते ३१ जानेवारी

पुलगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्यीकरण धोक्यात आले होते. यामुळे उच्च न्यायालयाचे आदेश व राज्य शासनाच्या निर्देशामुळे शहरात २८ ते ३१ जानेवारी या काळात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. प्रारंभीच्या दोन दिवसात जवळपास दोनशे अतिक्रमण हटविण्यात आले. शहरातील अनेक चौकांना भग्नावशेषाचे स्वरूप प्राप्त झाले. अतिक्रमण हटाव मोहिमेतून विद्यमान नगराध्यक्षापासून, माजी नगराध्यक्ष व दिग्गज देखील सुटू शकले नाहीत. स्वच्छ व सुंदर शहर मोहीमेअंतर्गत नगर प्रशासनाने राबवित असलेल्या मोहिमेबाबत अतिक्रमण धारकांचा नगरपरिषद अधिनियम १६५ अंतर्गत व्यावसायिकांनी शहरातील रस्ते, नाल्या व शासकीय जागेवर केलेले अवैध बांधकाम हटविण्याच्या पूर्व सूचना संबंधितांना दिल्या होत्या. परिसरातील काही मंडळींनी अतिक्रमण स्वत:च हटविले. शासनाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत छोट्या व्यावसायिकांत नाराजीचा सूर आहे. यात काहींनी पालिकेवर मोर्चा नेत नाराजी व्यक्त केली. गुरुवारी या मोहिमेत अतिक्रमण हटविल्यामुळे शहरातील भगतसिंग चौक, तुकडोजी चौक, आठवडी बाजार, बस स्थानक परिसराचे सुटकेचा नि:श्वास घेतला. मोहीमेत मुख्याधिकाऱ्यांसह १५० कर्मचारी, अधिकारी, २५ पोलीस, चार जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या मदतीने ही मोहीम सुरू आहे. या संदर्भात मुख्याधिकारी राजेश भगत यांच्याशी नगरपरिषद कार्यालयात व भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही तर मुख्याधिकाऱ्यांसह या मोहिमेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कारवाई दरम्यान होत असलेल्या घडमोडी कळू शकल्या नाहीत.(तालुका प्रतिनिधी)