शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राबविणार बाल स्वच्छता मिशन

By admin | Updated: November 12, 2014 22:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता, घर व परिसरातील स्वच्छता

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता, घर व परिसरातील स्वच्छता वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची बांधणी, अंगणवाडी व सार्वजनिक शौचालयाची बांधणी, उघड्यावर शौचालयाची प्रथा बंद करण्याकिरता कार्य सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यात बाल स्वच्छता मिशन सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली आहे. केंद्र शासनाच्या सुचनेंतर्गत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बाल स्वच्छता मिशन राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छतेचे संदेश, हात धुणे व प्रचार प्रसिद्धीकरिता बालकांना महत्त्वाचे दूत म्हणून या मोहिमेत सहभागी करून घ्यावयाचे आहे. आणि हा कार्यक्रम गाव, तालुका व जिल्हा स्तरावर राबवावयाचा आहे. १४ ते १९ नोव्हेंबर २०१४ (जागतिक स्वच्छतागृह दिन) पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये बालकांना लघुशंका व शौचालयाला जाण्याकरिता जागेची उपलब्धता, शाळामध्ये तसेच प्रत्येक घरी शौचालय व्यवस्था, बसस्थानक, बसथांबे, यात्रा स्थळे, उपहार गृहे, प्रक्षेणिय स्थळ, आठवडी बाजार, मैदाने, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे व वेळेवर स्वच्छतागृह उपलब्ध होणे या बालकांच्या हक्कांची त्यांना जाणिव करून देण्यात येणार आहे.स्वच्छतेच्या परिपाठामध्ये बालकांमध्ये स्वच्छतेची जागृती करणे हा या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. बाल स्वच्छता मिशन अंतर्गत तालुका स्तरावर गाव व ग्रामपंचायत स्तरावर निबंध स्पर्धा, भित्तीचित्रक स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्वच्छ परिसर स्पर्धा, स्वच्छ शाळा व अंगणवाडी स्पर्धा, यास स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र काटोलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)