शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने अपंगांना मिळाला न्याय

By admin | Updated: March 30, 2017 00:41 IST

नगर पंचायतने तीन टक्के निधी अपंगांच्या खात्यात जमा करावा या व अन्य मागण्यांसाठी

न.पं. समोर डेरा आंदोलन : ३ टक्के निधीचे होणार वाटप सेलू : नगर पंचायतने तीन टक्के निधी अपंगांच्या खात्यात जमा करावा या व अन्य मागण्यांसाठी बुधवारी नगर पंचायतसमोर डेरा आंदोलन करण्यात आले. प्रहार अपंग क्रांती संघटननेने सकाळी १० वाजतपासून डेरा आंदोलन सुरू केले. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ३ टक्के निधीचे त्वरित वाटप केले जाणार असल्याची ग्वीही देण्यात आली. अनेक दिवसांपासून येथील अपंग संघटनेकडून ३ टक्के निधी थेट त्यांच्या खात्यात रोख स्वरुपात जमा करावी, व्यापारी संकुलात ३ टक्के गाळे राखीव ठेवावे, अपंग लाभार्थ्यांना घरटॅक्समध्ये सवलत देण्यात यावी, आदी मागण्या लावून धरण्यात येत होत्या. त्यांच्या पुर्ततेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे म्हणून संघटनेचे जिल्हा प्रमुख हनुमंत झोटींग, प्रदेश उपाध्यक्ष शैलेश सहारे, प्रमोद कुऱ्हाटकर, सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वात डेरा आंदोलन करण्यात आले. मागील अनेक महिन्यांपासून ३ टक्के निधी वाटपास नगर पंचायत टाळाटाळ करीत आहे. यामुळे जोपर्यंत हा निधी देण्यात येणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले. अपंगांच्या हक्काचा ३ टक्के निधीचा ९० हजारांचा धनादेश मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांना सोपविला. याप्रसंगी न.पं. उपाध्यक्ष चुडामन हांडे उपस्थित होते. सदर धनादेश बँकेत जमा होणार असून ती रक्कम ९७ लाभार्थ्यांना समान वाटप करण्यात येणार आहे. व्यापारी संकुलात ३ टक्के गाळे राखीव ठेवण्याबाबत तथा अपंग लाभार्थ्यांना घर टॅक्समध्ये सवलत देण्याबाबत नगर पंचायतच्या पुढील बैठकीमध्ये विचार करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्याधिकारी जाधव यांनी दिली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर तोडगा निघाल्याने अपंगांनी समाधान व्यक्त करीत आंदोलन मागे घेतले. यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अपंगांनी सहभाग घेतला.(तालुका प्रतिनिधी)