शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयने केली ५.९ लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. या कापसापासून १ लाख एक हजार ५०० कापूस गाठींची निर्मिती जिल्ह्यात करण्यात आली.

ठळक मुद्देजागेअभावी केंद्र बंद करण्याची वेळ : जादा भावामुळे शेतकऱ्यांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेने जिल्ह्यातील आठ कापूस खरेदी केंद्रांवर ५ लाख ९ हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. येथे कापसाला खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव दिला जात असल्याने या केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होऊन केंद्र जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. या कापसापासून १ लाख एक हजार ५०० कापूस गाठींची निर्मिती जिल्ह्यात करण्यात आली. राज्य सरकारचा पणन महासंघ व खासगी व्यापारी यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या भावापेक्षा दोनशे रुपयांनी सीसीआयचा भाव अधिक आहे. सध्या ५ हजार ४५० रुपये भाव सीसीआयकडून दिला जात असल्याने शेतकरी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस आणत आहे.कासवगती खरेदीचा भुर्दंड शेतकऱ्यांची माथीरोहणा : येथील ग्लोबल कोटस्पीनमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. परंतु, शेतमाल खरेदीही ही प्रक्रिया अतिशय कासवगतीने होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर कापूस भरलेली वाहने दोन-दोन दिवस उभी ठेवावी लागतात. त्या वाहनांचे भाडे मात्र शेतकऱ्यांना अदा करावे लागत आहे. सीसीआयच्या या कापूस खरेदी केंद्रावर परिसरातील शेतकरी मालवाहूने तसेच बैलबंडीने कापूस विक्री करीता आणतात. मात्र, कापूस खरेदी कासवगतीने होत असल्याने बैलांसाठी वैरणही शेतकऱ्यांना सोबत घेऊन यावे लागत आहे. जागेसह इतर कारणे पुढे करून कापूस खरेदीच्या गतीलाच बे्रक लावल्या जात आहे. दिवसभऱ्यात केवळ २० मालवाहू आणि दहा बैलगाडीमधील कापसाची खरेदी केली जात आहे. एकूणच ५०० क्विंटलच्यावर कापूस खरेदी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुंर्दंड सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर सीसीआयच्या खरेदी केंद्रावर रात्र काढावी लागत आहे. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविण्यात येत असल्याने अनेक शेतकरी नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांना कापूस देताना दिसतात. या सर्व प्रकाराचा फायदा घेत व्यापारीही कपाशी उत्पादकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे बघावयास मिळते.कापूस भरलेली बैलगाडी २४ फेबु्रवारीला सकाळी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर नेण्यात आली. त्याच दिवशी हा कापूस खरेदी होणे क्रमप्राप्त होते. पण विविध कारणे पुढे करून २५ फेब्रुवारीला दुपारी कापूस खरेदी करण्यात आला.- मंगेश सुपनार, शेतकरी, रोहणा.कापूस साठविण्यासाठी जिनिंगमध्ये जागा नाही. शिवाय जागा सध्या कमी पडत असून मजुरांचा अभाव आहे. त्यामुळे खरेदीची गती मंदावली आहे. खरेदी बंद होणार ही अफवा आहे.- नंदकिशोर सोकोये, केंद्र प्रमुख, सीसीआय.

टॅग्स :cottonकापूस