शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीमुळे गुदमरतोय चिमुकल्यांचा श्वास

By admin | Updated: March 28, 2017 01:07 IST

शहरात स्वच्छता नांदावी म्हणून पुलगाव नगर पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर : शाळा परिसरात घाणीचे साम्राज्यवर्धा : शहरात स्वच्छता नांदावी म्हणून पुलगाव नगर पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी काही भागात ही स्वच्छता मोहीम पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शाळेतील चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेच्या टीपू सुलतान उर्दु प्राथमिक शाळेचा परिसर दुर्गंधीमध्ये हरविला आहे. पालिकेने याकडे लक्ष देत स्वच्छता राखणे व शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे.नगर पालिका प्रशासनापासून हाकेच्या अंतरावर पालिकेची टीपू सुलतान उर्दु प्राथमिक शाळा आहे. या शाळेचे प्रांगण सोडले तर अन्यत्र घाणीचे साम्राज्यच दिसून येते. रुग्णालय वसाहतीच्या बाजूला गल्लीमध्ये ही शाळा आहे. रस्त्याच्या कडेला दुकाने असून सदर बोळीचा वापर स्वच्छतागृह म्हणूनच केला जातो. शाळेच्या मागील भागात नागरिक, दुकानदार कचरा आणून टाकतात. शाळेमध्ये गोरगरीब घरातील मुले शिक्षण घेतात. या चिमुकल्यांचे आरोग्यच दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे. वराहांचा सुळसुळाट असून शाळेतून बाहेर पडताच घाणीशी सामना होतो. नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)पुलगाव येथे रेल्वेच्या भिंतीलगतही उकिरडेटीपू सुलतान शाळेच्या मागील भागात पुलगाव रेल्वे स्थानक आहे. या भागातही सांडपाण्याच्या नाल्या वाहत असून त्याची दुर्गंधीही शाळेतील वातावरण दूषित करीत आहे. शाळेच्या मागील भागातही कचरा टाकला जात असून वराहांचा उच्छाद असतो. या प्रकारामुळे चिमुकल्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.अतिक्रमणातील ठेलेही रस्त्यावरशाळेत जाण्याकरिता असलेल्या मार्गावर अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये हटविण्यात आलेले ठेले ठेवण्यात आले आहेत. परिणामी, रस्ता अरूंद झाला आहे. शिवाय याच भागात घाण केली जात असल्याने त्या परिसरात उभे राहणेही शक्य होत नाही. मग, विद्यार्थी शिक्षण कसे घेऊ शकतील, हा प्रश्नच आहे. शिवाय शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.