शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात दोघे जागीच गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  समुद्रपूर : जामकडून नागपूरकडे जाणारी भरधाव कार समोरील वाहनावर धडकल्याने कारमधील दोघे जागीच ठार झाले. हा ...

ठळक मुद्देकारचा झाला चुराडा : जाम-नागपूर महामार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : जामकडून नागपूरकडे जाणारी भरधाव कार समोरील वाहनावर धडकल्याने कारमधील दोघे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जाम ते नागपूर महामार्गावर झाला. कारचा चेंदामेंदा झाला असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.अमोल नागरकर (२०) रा. मालेगाव, जि. यवतमाळ व नितीन भगत (२१) रा. कोरा असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही एम. एच. ३१-६५७७ क्रमांकाच्या कारने जामकडून नागपूरला जात होते. भरधाव असलेल्या या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून समोरील वाहनाला जबर धडक दिली. या धडकेत कारचा चुराडा झाला असून दोघांचेही मृतदेह कारमध्ये अडकले होते. अक्षरश: कारची पत्रे कापून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस जाम, येथील सहायक पोलीस निरीक्षक भारत कराळे, सुधाकर कुमरे, नरेंद्र दिघडे व चमू तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतांना शवविच्छेदनाकरिता समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथून त्यांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातानंतर समोरील वाहनाने घटनास्थळावरून पळ काढल्याने वाहनाची माहिती मिळू शकली नाही. समुद्रपूर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदवून वाहनाचा शोध घेतला पण, वाहनाचा कुठेही पत्ता लागला नाही. याप्रकरणाचा पुढील तपास समुद्रपूर पोलीस स्टेशनचे सुभाष शेंडे, प्रल्हाद जाधव आणि त्यांचे सहकारी करीत आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू