बोरगाव (पु.) ग्रामस्थांचे ड्रममध्ये बसून आंदोलन

By Admin | Updated: April 21, 2016 02:25 IST2016-04-21T02:25:01+5:302016-04-21T02:25:01+5:30

बोरगाव (पुनर्वसन) येथे आठ-दहा दिवसांपासून पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन-तीन किमी अंतर पार करावे लागत आहे.

Borgaon (P) sit and move in the drums of villagers | बोरगाव (पु.) ग्रामस्थांचे ड्रममध्ये बसून आंदोलन

बोरगाव (पु.) ग्रामस्थांचे ड्रममध्ये बसून आंदोलन

आर्वी : बोरगाव (पुनर्वसन) येथे आठ-दहा दिवसांपासून पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन-तीन किमी अंतर पार करावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी निवेदन देऊनही निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयाने कारवाई केली नाही. अखेर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप, पदाधिकारी व ग्रामस्थांनी बुधवारी ड्रममध्ये बसून आंदोलन केले. याची दखल घेत अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करण्याची लेखी ग्वाही दिली.
आठ-दहा दिवसांपासून बोरगाव (पु.) येथे भीषण पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन किमीपर्यंत भटकावे लागत आहे. गावातील बहुतांश नागरिक मजुरी करून उदरनिर्वाह करतात. पाण्याची सोय करण्यासाठी मजुरी सोडून त्यांना घरी राहावे लागत आहे. परिणामी, पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे नागरिक त्रस्त झालेत. ग्रामस्थांनी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयाला निवेदने दिली; पण कुठलीही कारवाई झाली नाही. नागरिक कार्यालयात चौकशीला गेले असता अहवाल टाळाटाळ केली जात होती. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला होता.

Web Title: Borgaon (P) sit and move in the drums of villagers