शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीपासून हाकेच्या अंतरावर होत होता पेट्रोलचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

नायब तहसीलदार बाळूताई भागवत यांनी स्वत: ग्राहक बनून या पेट्रोलपंपावर पेट्रोलचा काळाबाजार होतो काय याची पडताळणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देत चढ्या दरानेच पेट्रोलची विक्री होत असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्यांनी या धक्कादायक प्रकारची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पेट्रोलच्या काळाबाजाराचा विषय कळताच बड्या अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात राजपाल यांच्या पेट्रोलपंपाला सील ठोकण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहिला नायब तहसीलदारांनी ठोकले पेट्रोलपंपाला सील

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महिलाश्रम भागातील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल देत संचारबंदीच्या काळात चढ्या दराने पेट्रोलची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार महिला नायब तहसीलदारांनी स्वत: ग्राहक बनून केलेल्या स्ट्रींग ऑपरेशननंतर पुढे आला आहे. हा पेट्रोलपंप शहरातील नामवंत व्यावसायिक राजपाल यांच्या मालकीचा असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पेट्रोलचा काळाबाजार केला जात असलेल्या या पेट्रोलपंपाला सील ठोकण्यात आले.राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर सकाळी ७ ते ११ या वेळेत शहरातील पेट्रोलपंप सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली आहे. तर सकाळी ११ नंतर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंप वगळता इतर पेट्रोलपंप मालकांनी पेट्रोल व डिझेलची विक्री शहरात करू नये,  अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. परंतु, वर्धा-सेवाग्राम मार्गावरील महिलाश्रम येथील इंडियन ऑईल कंपनीच्या  पेट्रोलपंपावर मालक व पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने जिल्हा प्रशासनाने दिलेली मुदत संपल्यावरही पेट्रोलची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर नायब तहसीलदार बाळूताई भागवत यांनी स्वत: ग्राहक बनून या पेट्रोलपंपावर पेट्रोलचा काळाबाजार होतो काय याची पडताळणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देत चढ्या दरानेच पेट्रोलची विक्री होत असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्यांनी या धक्कादायक प्रकारची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पेट्रोलच्या काळाबाजाराचा विषय कळताच बड्या अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात राजपाल यांच्या पेट्रोलपंपाला सील ठोकण्यात आले आहे.

बाटलीत साठवून ठेवायचे पेट्रोलप्लास्टिकच्या बाटलीत अतिज्वलनशील पदार्थ असलेले पेट्रोल देऊ नये, असा नियम आहे, शिवाय तसे फलकही प्रत्येक पेट्रोलपंपावर लावण्यात आले आहेत. परंतु, महिलाश्रम येथील राजपाल यांच्या पेट्रोलपंपावर पेट्रोलचा काळाबाजार करणारे प्लास्टिकच्या बाटलीत साठवून ठेवलेले पेट्रोल चढ्या दराने ग्राहकांना विकत होते. 

कारवाई रोखण्यासाठी दबाव नायब तहसीलदार बाळू भागवत हे या पेट्रोलचा काळाबाजार करणाऱ्या पेट्रोलपंपाला सील ठोकण्याची कारवाई करीत असताना त्यांनी ही कारवाई करू नये म्हणून त्यांच्यावर मोठा दबाव आणला जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले.

 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपTahasildarतहसीलदार