शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सभापती पदांवरही भाजपचाच कब्जा

By admin | Updated: October 4, 2014 23:30 IST

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक गोंधळ व हाणामारीने गाजली़ यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते;

वर्धा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक गोंधळ व हाणामारीने गाजली़ यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते; मात्र ही निवडणूक शांततेत पार पडली़ जि़प़ सभापती पदावर २४ विरूद्ध १७ मतांनी विजय मिळवित भाजपानेच कब्जा केला़जि़प़ सभापती पदाची निवडणूक सर्वांना कुतूहलाचा विषय ठरला होता़ अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बहुमत नसतानाही काँगे्रसचे सदस्य गैरहजर राहिल्याने भाजपाला सत्ता काबीज करता आली होती़ सदस्यांच्या गैरहजेरीवरूनच सभेत गदारोळही करण्यात आला होतो़ अखेर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी चित्र रणनवरे यांची तर उपाध्यक्ष पदावर विलास कांबळे यांची वर्णी लागली होती़ हा प्रकार पाहूनच पोलीस यंत्रणेने सभापती पदाच्या निवडणुकीत गदारोळ होऊ नये म्हणून सकाळपासून जिल्हा परिषद परिसरात बंदोबस्त लावला होता़ शनिवारी दुपारी २ वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला़ समाज कल्याण सभापती पदासाठी काँगे्रसकडून नंदकिशोर कंगाले तर भाजकडून वसंता पाचोळे, महिला व बालकल्याण सभापती पदाकरिता काँगे्रसच्या निलिमा दंढारे तर भाजपच्या चेतना मानमोडे, विषय समित्यांच्या सभापती पदाकरिता काँगे्रसचे गजानन गावंडे, मनोज चांदुरकर तर भाजपचे मिलिंद भेंडे व अपक्ष श्यामलता अग्रवाल यांनी अर्ज दाखल केला होता़ यात समाज कल्याण सभापती पदावर २४ मते घेत भाजपचे वसंता पाचोळे विजयी झाले़ कंगाले यांना १७ मते मिळाली़ महिला व बालकल्याण सभापतीपदी २४ मते घेत चेतना मानमोडे विजयी झाल्या तर १७ मते घेणाऱ्या निलिमा दंढारे पराभूत झाल्या़ विषय समित्यांच्या सभापती पदावर भाजपचे मिलिंद भेंडे व अपक्ष श्यामलता अग्रवाल यांची वर्णी लागली़ त्यांना प्रत्येकी २४ मते मिळाली तर गावंडे व चांदुरकर पराभूत झाले़ शांततामय वातावरणात जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक पार पडल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले जात होते़(कार्यालय प्रतिनिधी)