शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज भरूनही नाहकरत देण्यास बँकेची टाळाटाळ

By admin | Updated: May 1, 2015 23:59 IST

नजीकच्या हिवरा (कावरे) येथील ज्ञानेश्वर भाऊराव झोरे या शेतकऱ्याने बँक आॅफ इंडिया शाखा भिडी येथून ट्रॅक्टर व शेतीसाठी कर्ज घेतले होते.

शेतकरी अडचणीत : बँक प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरेविजयगोपाल : नजीकच्या हिवरा (कावरे) येथील ज्ञानेश्वर भाऊराव झोरे या शेतकऱ्याने बँक आॅफ इंडिया शाखा भिडी येथून ट्रॅक्टर व शेतीसाठी कर्ज घेतले होते. सदर कर्ज व्याजासहीत भरले असतानाही त्यांना बँक प्रशासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. सविस्तर वृत्तानुसार, हिवरा (कावरे) येथील ज्ञानेश्वर भाऊराव झोरे यांनी बँक आॅफ इंडिया शाखा भिडी येथून ट्रॅक्टरसाठी रू. ७ लाख व शेतीवरती एक लाखाचे क्रॉप लोन असे एकून आठ लाखाचे कर्ज घेतले. यासाठी त्यांनी आपली हिवरा (कावरे) येथील शेती बँकेला गहाण करून दिली. या कर्जाची परतफेड न झाल्याने त्यावरील व्याज वाढून ते १३ लाखावर पोहोचले. त्यामुळे ही केस लोक अदालत वर्धा येथे पाठविण्यात आली. त्या ठिकाणी काहीही तडजोड न झाल्याने सदर प्रकरण बँकेत परत आले. त्या नंतर बँक मॅनेजर काळे यांनी झोरे यांना बँकेत बोलावून चार जणांसमोर एकमुक्त रक्कम भरण्यासाठी तयार केले. तडजोडीनुसार १० लाख ७५ हजार रुपये १८ मार्च २०१५ भरण्यात आले. पैसे भरल्यानंतर दुपारी ४ वाजता येऊन शेतीवरील नाहरकत प्रमाणपत्र घेऊन जा असे बँक मॅनेजर काळे यांनी झोरे यांना सांगितले. त्यामुळे ठरलेल्या वेळेवर झोरे प्रमाणपत्रासाठी गेले असता त्यांना दुसऱ्या दिवशी या असे सांगण्यात आले. ते दुसऱ्या दिवशी गेले असता त्यांना परत पाठविण्यात आले. तेव्हापासून आजतागायत झोरे यांना नाहरकत प्रमाणपत्रासाठी टाळाटाळ करून अपमानास्पद वागणूक देऊन परत पाठविले जात असल्याचे झोरे यांनी सांगितले. शेती विकून त्यांनी बँकेचे कर्ज भरले. तसेच ट्रॅक्टरही विकला. ज्यांना तो ट्रॅक्टर विकला ते ट्रॅक्टर नावे करून देण्याकरिता किंवा पैसे परत करण्याचा तगादा लावित आहे. परंतु पैसे नसल्याने ते परत कसे करायचे असा प्रश्न पडल्याचे झोरे सांगत आहे. सेटलमेंट अंतर्गत झोरे यांनी तेरा लाखाचे लोन एका दमात दहा लाख पंचात्तर हजारात नील केले. तसेच एक एक लाखाची त्यांची बँकेत एफडी होती. त्याचे व्याजासहित एक लाख बेचाळीस हजार रुपये झाले. तेही त्या लोनमध्ये जमा केले. म्हणजे दहा लाख पंचात्तर हजार व एक लाख बेचाळीस हजार असे मिळून बारा लाख सतरा हजार रूपये जमा झाले. त्यामुळे त्यांनी पूर्ण कर्ज फेडल्याचे ते सांगत आहे. असे असतानाही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ते अडचणीत आले आहे.(वार्ताहर)बँकेतील संबंधितांवर कारवाईची मागणीकर्जाची रक्कम सेटलमेंट अंतर्गत एकहाती भरूनही बँक प्रशासनाकडून ज्ञानेश्वर झोरे यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे झोरे सांगत आहेत. प्रमाणपत्राअभावी त्यांची अनेक कामे अडली आहेत. तसेच प्रमाणपत्रासाठी बँकेत गेले असता त्यांना वारंवार अपमानित केले जात असल्याचे झोरे यांनी सांगितले. झोरे यांचे प्रकरण मंजुरीसाठी झोनल मॅनेजर नागपूर यांच्याकडे पाठविले असून झोनल मॅनेजरची मंजुरी आल्यानंतर झोरे यांना एन.ओ.सी. देण्यात येईल, असे सांगितले.-अनिल काळे बँक व्यवस्थापक, भिडी