शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पथविक्रेत्यांना हटविण्यातून होणारा कायद्याचा भंग टाळा

By admin | Updated: October 30, 2016 00:56 IST

केंद्र शासनाने मार्च २०१४ च्या कायद्याने पथविक्रेते, फेरीवाले यांना स्पष्ट व नि:संदिग्ध संरक्षण दिले आहे.

जिल्हा प्रशासनाला साकडे : अन्यथा प्रशासनाविरूद्ध कायदेशीर कारवाईचा पवित्रावर्धा : केंद्र शासनाने मार्च २०१४ च्या कायद्याने पथविक्रेते, फेरीवाले यांना स्पष्ट व नि:संदिग्ध संरक्षण दिले आहे. या कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी. पोलीस विभाग, नगरपालिका प्रशासन व इतर संबंधित विभागांना फेरीवाले, पथविक्रेत्यांना हटविण्याच्या कारवाईने कायद्याचा भंग होतो, असा सुस्पष्ट निर्देश द्यावा, अशी मागणी युवा सोशल फोरमने केली. याबाबत शुक्रवारी जिल्हा प्रशासनला निवेदनही देण्यात आले.याउपरही पथविक्रेत्यांसाठीच्या कायदेशीर हक्काचा भंग झाल्यास जिल्हा प्रशासनाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, वर्धा हॉकर्स कमिटीचे अध्यक्ष विनोद वानखेडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांना निवेदन सादर केले.काही महिन्यांपासून वर्धा शहरात असंघटित क्षेत्रात कार्यरत फरीवाले, हातगाडीवाले, फळे-भाज्यांचे लहान विक्रेते, चिल्लर वस्तूंचे लहान विक्रेते यांना अतिक्रमण करणारे म्हणून त्रास दिला जात आहे. प्रशासकीय यंत्रणा, पोलिसांकडून धाक दाखवून जबरीने त्यांच्या व्यवसायाच्या जागा सोडायला भाग पाडले जात आहे. असंघटित क्षेत्रात अत्यल्प नफा तत्वावर काम करणारे हे विक्रेते त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती स्वत: करतात. असंघटित क्षेत्रातील व कामगारांच्या उपजीविकेच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत तसेच नगरनियोजन व अतिक्रमण याबाबत प्रशासकीय सुस्पष्टता आणणे, पथविक्रेत्यांसाठी योग्य कायदेशीर संरक्षण पुरविण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाने कायदा अंमलात आणला. कायद्याने स्थापित प्रक्रियेवर त्वरित अंमल करावा. दरम्यान, पोलीस विभाग, पालिका व संबंधित विभागांना पथविक्रेत्यांना हटविण्याच्या कारवाईने कायद्याचा भंग होतो, हा सुस्पष्ट निर्देश द्यावा. यापूढे त्यांच्या कायदेशीर हक्काचा भंग झाल्यास जिल्हा प्रशासनाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना राजाभाऊ वानखेडे, श्रीकांत बारहाते, गजेंद्र सुरकार, अतुल शेंद्रे, वैभव तळवेकर, हबीबउल्लाह खान, अहमद खान, राजू वैद्य, मंगेश गांडोळे, अशोक वेले, चेतन कडू आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)