शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबुडव्यांना माफी; शेतकऱ्यांना का नाही?

By admin | Updated: November 18, 2016 02:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करीत सामान्य, शेतकरी, मजुरांच्या बँकेतील रकमेवर कठोर नियंत्रण लादले.

समता परिषदेचा सवाल : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाला निवेदनवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करीत सामान्य, शेतकरी, मजुरांच्या बँकेतील रकमेवर कठोर नियंत्रण लादले. आर्थिक आणीबाणी लादली. नागरिक हक्काच्या पैशासाठी बॅकांसमोर हतबलपणे उभे आहे. सामान्यांना पैशासाठी ताटकळावे लागत असताना उद्योगांच्या नावावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडविणाऱ्यांना मात्र कर्जमाफी देण्यात आली. कर्जबुडव्यांना माफी दिली जाते तर मग, शेतकऱ्यांना का नाही, असा संतप्त सवाल म. फुले समता परिषदेने केला आहे. याबाबत गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.अनेक उद्योगपतींनी हजारो कोटींचे कर्ज उचलून बँकांची फसवणूक केली. ते पैसे बेकायदेशीरपणे अन्यत्र पळविले. त्यातून हजारो कोटींची काळी माया जमविली. त्या ‘डिफॉल्टर’ उद्योपतींची ईडीमार्फत चौकशी करणे, सरकारी बँकांचे पैसै वसूल करीत त्यांना तुरूंगात टाकण्याऐवजी त्यांना कर्जमाफी दिली जात आहे. देशाच्या सर्वात मोठ्या सरकारी मालकीच्या स्टेट बँक आॅफ इंडियाने मोदी सरकार व रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सहेतुक कर्जबुडव्या उद्योगपतींचे तब्बल ४८ हजार कोटींचे कर्ज सपशेल माफ केले. विविध बँकांची फसवणूक करून कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या व सरकारने आंतरराष्ट्रीय वॉरंट काढून भारतात पकडून आणण्यासाठी आवाहन केलेल्या गुन्हेगार विजय माल्या याला तब्बल १ हजार २०१ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला दीडपट भाव देण्याची आश्वासने हवेत विरली. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्यास पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे, असा आरोपही केला. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे ३५ हजार कोटी रुपयांचे सर्व बँकांचे कर्ज त्वरित माफ करावे, अशी मागणी समता परिषदेने केली. यावेळी प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, कविता मुंगले व पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)भाजप सरकारचा नोंदविला निषेधशेतकऱ्यांबाबत संवेदना शून्य झालेल्या भाजपच्या सरकारांनी त्यांची साक्ष दखलही घेतली नाही. समता परिषदेने शेतकरी विरोधी सरकारी राजवटीचा जाहीर निषेध केला. शेतकरी आत्महत्या हे या सरकारचेच पाप असल्याने शेतकऱ्यांचे सर्व कर्ज त्वरित माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली.