शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका चालक ‘जयपाल’चा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूची वार्ता गावात पोहोचताच संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. रूग्णालयातून मृतदेह रूग्णवाहिकेने पीडितेच्या मुळगावी घेऊन जात असताना रुग्णवाहिका चालक जयपाल वंजारी यांना अनेक अडथळे आले.

ठळक मुद्देजळीत हत्याकांड प्रकरण : पोलीस विभागाकडून गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट येथील पेट्रोल हल्ल्यातीन प्राध्यपक युवती मृत पावल्याने मृतदेह गावात येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, अनेकांनी रास्तारोको करुन तुफान दगडफेक केली. अशाही परिस्थितीत मोठ्या धैर्याने रुग्णवाहिकेतून मृतदेह घरापर्यंत पोहोचविणाऱ्या जयपाल यशवंत वंजारी या रुग्णवाहिका चालकाचा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याहस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.हिंगणघाट येथील नंदोरी चौकात प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूची वार्ता गावात पोहोचताच संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. रूग्णालयातून मृतदेह रूग्णवाहिकेने पीडितेच्या मुळगावी घेऊन जात असताना रुग्णवाहिका चालक जयपाल वंजारी यांना अनेक अडथळे आले. गावातील संतप्त नागरिकांचा आक्रोश अनावर झाल्याने त्यांनी चक्क रूग्णवाहिकेच्या समोर दगड, झाडांचे खोडं टाकून रूग्णवाहिका अडविली. यादरम्यान काहींनी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. तरीही जिवाची पर्वा न करता चालक जयपाल वंजारी यांनी मृतदेह घरापर्यंत पोहोचविला. त्यांच्या या धाडसी कामगिरीची दखल घेत पोलीस विभागाकडून त्यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, गुन्हे शाखेचे ठाणेदार नीलेश ब्राम्हणे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Policeपोलिस