रुग्णवाहिका चालक ‘जयपाल’चा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:13+5:30

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूची वार्ता गावात पोहोचताच संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. रूग्णालयातून मृतदेह रूग्णवाहिकेने पीडितेच्या मुळगावी घेऊन जात असताना रुग्णवाहिका चालक जयपाल वंजारी यांना अनेक अडथळे आले.

Ambulance Driver 'Jaipal' honored | रुग्णवाहिका चालक ‘जयपाल’चा सत्कार

रुग्णवाहिका चालक ‘जयपाल’चा सत्कार

Next
ठळक मुद्देजळीत हत्याकांड प्रकरण : पोलीस विभागाकडून गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंगणघाट येथील पेट्रोल हल्ल्यातीन प्राध्यपक युवती मृत पावल्याने मृतदेह गावात येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, अनेकांनी रास्तारोको करुन तुफान दगडफेक केली. अशाही परिस्थितीत मोठ्या धैर्याने रुग्णवाहिकेतून मृतदेह घरापर्यंत पोहोचविणाऱ्या जयपाल यशवंत वंजारी या रुग्णवाहिका चालकाचा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याहस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूची वार्ता गावात पोहोचताच संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. रूग्णालयातून मृतदेह रूग्णवाहिकेने पीडितेच्या मुळगावी घेऊन जात असताना रुग्णवाहिका चालक जयपाल वंजारी यांना अनेक अडथळे आले. गावातील संतप्त नागरिकांचा आक्रोश अनावर झाल्याने त्यांनी चक्क रूग्णवाहिकेच्या समोर दगड, झाडांचे खोडं टाकून रूग्णवाहिका अडविली. यादरम्यान काहींनी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. तरीही जिवाची पर्वा न करता चालक जयपाल वंजारी यांनी मृतदेह घरापर्यंत पोहोचविला. त्यांच्या या धाडसी कामगिरीची दखल घेत पोलीस विभागाकडून त्यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, गुन्हे शाखेचे ठाणेदार नीलेश ब्राम्हणे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Ambulance Driver 'Jaipal' honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस