शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषणाने डोळ्यांच्या आजारात वाढ

By admin | Updated: May 20, 2014 23:51 IST

अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या सृष्टीचे अवलोकन करण्यासाठी आपले डोळे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात; पण मनाच्या स्वार्थी स्वभावामुळे होणार्‍या पर्यावरण ºहासाचा परिणाम डोळ्यावर होत आहे़

वर्धा : अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या सृष्टीचे अवलोकन करण्यासाठी आपले डोळे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात; पण मनाच्या स्वार्थी स्वभावामुळे होणार्‍या पर्यावरण ºहासाचा परिणाम डोळ्यावर होत आहे़ सृष्टीच्या विनाशामुळे ही दृष्टीच संकटात आल्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ आधुनिक जीवनशैली, औद्योगिकरण आदी घटकांमुळे डोळे प्रभावित होत आहेत़ दररोज होणारे वायूप्रदूषण, अनेक विषारी वायू डोळ्यांच्या दृष्टीपटलास इजा पोहोचविण्यास कारणीभूत ठरत आहे. घराबाहेर निघताच डोळ्यांचा प्रत्यक्ष संबंध कॉर्बनडाय आॅक्साईड, बॅक्टेरिया, धुळीचे कण आदींशी येतो़ यामुळे डोळ्यांबाबतचे अनेक आजार समोर येत आहेत़ डोळ्यांच्या संरक्षणाच्या दृ्ष्टीने पर्यायी साधनांचा वापर न केल्यास विषारी वायूचा थेट परिणाम डोळ्यावर होतो. औद्योगिक प्रदूषणासोबतच हॉटेल, भट्टी, जाळण्यात आलेला कचरा, प्लास्टिक आदींसह वाहनातून निघणारा धूर डोळ्यांवर परिणाम करीत आहे. वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी याचे प्रमाणे अधिक दिसून येते. गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईडचे उर्त्सजन होते. यामुळे त्याचा प्रभाव डोळ्यांवर होत आहे़ शरिराचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असलेल्या डोळ्यांवर होणार्‍या विविध वायूच्या मार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे़ सध्या वातावरणात कॉर्बन मोनोक्साईड २ टक्के प्रमाणे वाढले आहे़ हे डोळ्यासाठी अत्यंत हानीकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ याकडे लक्ष देत उपायायोजना करणे गरजेचे आहे़(स्थानिक प्रतिनिधी)