शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

गहू, चणा उत्पादनाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

गत वर्षीच्या तुलनेत यंदा तूर पिकाचे पिकाचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी घटले आहे. तर गहू व चणा पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोरोनामुळे शेतीची कामे आणि जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता सर्वच काही टाळेबंद आहेत. पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा १३ दिवसांचा कालावधी संपला असून वर्धा जिल्ह्यात यंदा किती गहू आणि चण्याचे उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नसल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देपीक कापणीचा प्रात्यक्षिक अहवाल खोळंबला

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षीच्या तुलनेत यंदा तूर पिकाचे पिकाचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी घटले आहे. तर गहू व चणा पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोरोनामुळे शेतीची कामे आणि जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता सर्वच काही टाळेबंद आहेत. पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा १३ दिवसांचा कालावधी संपला असून वर्धा जिल्ह्यात यंदा किती गहू आणि चण्याचे उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नसल्याचे पुढे आले आहे. लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात भाजीकोंडी होऊ देणार नाही असे म्हणत स्वत:ची पाठ थोपाटून घेणाऱ्या कृषी विभागाचा भोंगळ कारभारच या निमित्ताने पुढे आल्याचे दिसून येत आहे.गत वर्षी तुरीची ६९ हजार ५०० हेक्टरवर, गहू १७ हजार २७२ हेक्टर तर ३९ हजार ९८० हेक्टरवर चण्याची लागवड झाली होती. तर यंदाच्या वर्षी ६० हजार १३२ हेक्टरवर तुरीची लागवड झाली. शिवाय २२ हजार २१७ हेक्टरवर गहू आणि ४१ हजार ७१४ हेक्टरवर चण्याची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. परंतु, चणा व गहू या पिकाच्या कापणी प्रयोगाची अंतीम आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अद्याप प्राप्त झालेला नसल्याने यंदा गहू आणि चण्याचे जिल्ह्यात नेमके किती उत्पादन होईल यापासून कृषी विभाग अनभिज्ञ आहे. लॉकडाऊनमुळे कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितल्या जात आहे. गत वर्षी हेक्टरी १,१६८ किलो तर यंदाच्या वर्षी हेक्टरी १,२६३ किलो तुरीचा उतारा आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.९,३६८ हेक्टरने तुरीचे क्षेत्र घटलेगत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ९ हजार ३६८ हेक्टरने तूर पिकाचे क्षेत्र घटले आहे. तर ४ हजार ९४५ हेक्टरने गहू आणि १ हजार ७१६ हेक्टरने चण्याचे लागवड क्षेत्र वाढल्याचे नोंद कृषी विभागाने घेतली आहे.बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या शेतमालाची मळणी शिल्लकसध्यास्थितीत बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या तूर, गहू व चणा या शेतमालाची शिल्लक आहे. असे असले तरी जिल्ह्यात यंदा गहू आणि चण्याचे नेमके किती उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नाही. त्यामुळे या कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यंदाच्या वर्षीचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. परंतु, त्याची पूर्ण माहिती अद्यापही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला आतापर्यंत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात यंदा गहू आणि चण्याचे उत्पादन नेमके किती झाले हे अद्यापही अस्पष्ट आहे. लॉकडाऊनमुळे कामे पूर्णत्त्वास जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. लॉकडाऊन संपल्यावर आकडेवारी अपडेट होईल.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती