शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर ‘त्या’ २० शिक्षकांचे उपोषण मागे

By admin | Updated: December 25, 2015 02:51 IST

२१ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. वर्धा यांच्या कार्यालयासमोर २० शिक्षकांनी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

वैयक्तिक मान्यता न मिळाल्याने शिक्षकांची होत आहे उपासमार
वर्धा : २१ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. वर्धा यांच्या कार्यालयासमोर २० शिक्षकांनी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. २३ डिसेंबर रोजी रात्री उशिरा शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या सांगण्यावरून आंदोलन मागे घेण्यात आले.
२ मे २०१२ पूर्वी शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाची पद भरण्याची परवानगी घेवून नियमानुसार केलेल्या ६४ शिक्षकांच्या नियुक्त्यांपैकी २० शिक्षकांना काही त्रुटी अभावी जानेवारी महिन्याच्या शिबिरात वैयक्तिक मान्यता मिळू शकली नाही. परंतु दरम्यानच्या काळात सदर शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयात शिक्षणाधिकारी यांच्या चुकीमुळे पाठविण्यात आल्याचा आरोप संघटनेद्वारे करण्यात आला होता. त्यामुळे मागील साडेतीन वर्षापासून सदर शिक्षक विना वेतन विद्यादानाचे काम करीत होते.
अन्यायग्रस्त शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयात प्रलंबित असल्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी आॅगस्ट व आॅक्टोबर महिन्यात नियमानुसार घ्यावयाचे वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन केले नाही. दरम्यानच्या काळात अन्यायग्रस्त शिक्षकांसह वैयक्तिक मान्यता मिळण्याबाबत तक्रार निवारण समितीच्या वतीने तीनवेळा आंदोलने करण्यात आली. तरीही न्याय न मिळाल्याने त्या २० शिक्षकांनी पुन्हा २२ डिसेंबरपासून जि. प. समोर आंदोलन सुरू केले होते.
२३ डिसेंबरला शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी १५ दिवसांच्या आत प्रस्ताव प्राप्त करून मान्यता देण्याची कार्यवाही करावी असे आदेश शिक्षणाधिकारी यांना २३ डिसेंबरला दिल्यानंतर रात्री उशिरा उपोषण स्थगित करण्यात आले. १५ दिवसात शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशानुसार कार्यवाही न झाल्यास १६ व्या दिवशी पूर्ववत आंदोलन सुरू राहील, असा इशारा तक्रार निवारण समितीचे अजय भोयर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधींना उपोषणस्थळी दिला.
उपोषण मंडपाला जिल्हा परिषद सदस्य मनोज चांदुरकर, नाना ढगे, विलास कांबळे, समीर देशमुख, सतीश राऊत, रमेश टपाले, मनोहर वाके, पुंडलिक नागतोडे, रवी कोठेकर, नरेंद्र थुटे, विजय चौधरी, संजय बारी, रहिम शाह, इंद्रजीत ढोले, पुंडलिक राठोड, सुनील गायकवाड, गिरीश वानखेडे, साबळे, अजय कोल्हे, सतीश जगताप, यांच्यासह अनेकांनी पाठिबा दिला असून सर्वांचे कारवाईकडे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)