शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
6
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
7
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
8
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
9
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
10
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
11
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
12
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
13
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
14
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
15
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
16
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By admin | Updated: July 29, 2016 17:48 IST

अहमदनगर :कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार व खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपीस जिल्हा न्यायालयात आणले, त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़
कोपर्डी घटनेतील पहिल्यांदा ताब्यात घेतलेला आरोपी शिंदे हा गेल्या चौदा दिवसांपासून पोलीस कोठडीत होता़ या काळात आरोपीने पोलिसांकडे त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे़ मात्र, उर्वरित तपास, घटनास्थळाचा आरोपीसमवेत पंचनामा आणि इतर पुरावे एकत्र करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीत दोन वेळा वाढविण्यात आली होती़ या घटनेचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चार दिवसांपूर्वी आरोपीस कोपर्डी येथील घटनास्थळी नेऊन पंचनामाही केला होता़ गुरुवारी आरोपीची चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश आऱएम़ पांडे यांनी आरोपीला ९ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती़
या आरोपीवर न्यायालय परिसरात दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी गुरुवारी मोठा बंदोबस्त तैनात केला होता़ आरोपीला घेऊन येणारे वाहन थेट न्यायालयाच्या दारात उभे करण्यात आले होते.
सुनावणी अवघ्या पाच मिनिटात झाल्याने त्याला तातडीने न्यायालयाबाहेर नेण्यात आले़ दरम्यान या घटनेत पोलिसांच्या ताब्यात असलेले संतोष भवाळ व नितीन भैलुमे या आरोपींची पोलीस कोठडी शनिवारी संपणार आहे़
(प्रतिनिधी)
आरोपी जितेंद्र शिंदे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला सबजेलमध्ये नेण्यात आले होते़ मात्र, तेथे जागा नसल्याने आरोपीला कर्जत येथील कारागृहातच ठेवण्यात येणार आहे़