शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वाहनास अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खरांगणा (मो.) : भरधाव असलेले पोलिसी वाहन अनियंत्रित होत उलटले. हा अपघात आर्वी मार्गावरील वाढोणा-पिपळखुटा दरम्यान ...

ठळक मुद्देआर्वी मार्गावरील घटना। चालक गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कखरांगणा (मो.) : भरधाव असलेले पोलिसी वाहन अनियंत्रित होत उलटले. हा अपघात आर्वी मार्गावरील वाढोणा-पिपळखुटा दरम्यान शनिवारी दुपारी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. सदर पोलिसी वाहनाने आरोपींना न्यायालयात नेले जात होते. दरम्यान हा अपघात झाला.प्राप्त माहितीनुसार, मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून अटक केलेल्या निळकंठ बापूराव उईके रा. सालधरा, किसना राठोड रा. चांदणी, किशोर भाऊराव दुर्गे रा. सावद, रोषण विष्णू तेलघरे रा. येळाकेळी तर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केलेल्या नाना शेषराव करणाके रा. पाचोड या आरोपींना आर्वी येथील कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यासाठी खरांगणा पोलिसांची चमू एम. एच. ३२ जे. २१९ क्रमांकाच्या पोलिसी वाहनाने घेऊन जात होती. भरधाव वाहन आर्वी मार्गावरील वाढोणा परिसरात आले असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन उलटले. यात वाहनचालक शशिकांत मुंडे, राजेश थोटे, गौरव नासरे तर आरोपींना इजा झाल्या. मुंडे, थोटे व नासरे यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर किरकोळ जखमी आरोपींना आर्वीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खरांगण्याचे ठाणेदार संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी घटनास्थळ गाठले होते.

टॅग्स :Accidentअपघात