शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक खड्ड्यात पाणी साचल्याने वाढले अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

सेवाग्राम-वर्धा या मार्गावर सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत नालीचे बांधकाम सुरु आहे. खोदकामात हॉटेलचे सांडपाणी वाहून जाणारी पाईपलाईन फुटली आहे. पूर्वी जुन्या नालीतून हॉटेलचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती आता नव्याने केलेल्या खोदकामात फुटली आहे. नाली खोदकामातील माती रस्त्याच्या बाजुने टाकली जात आहे. नाली बांधकामात खराब पाणी साचत असल्याने ते अडचण ठरत आहे. यासाठी सोमवारला चक्क मशीन लाऊन नालीतील पाणी काढण्यात आले. तरी सुद्धा पाझर कायम आहे.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : हॉटेलचे सांडपाणी सोडले जातात रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम-वर्धा मार्गावरील सेवाग्राम पोलीस स्टेशन नजीकच्या हॉटेलच्या समोर धोकादायक खड्डा आहे. या खड्डयात हॉटेलचे पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. येथे रोजच दुचाकी घसरत असल्याने हा खड्डा बुजविण्याची मागणी होत आहे.सेवाग्राम-वर्धा या मार्गावर सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत नालीचे बांधकाम सुरु आहे. खोदकामात हॉटेलचे सांडपाणी वाहून जाणारी पाईपलाईन फुटली आहे. पूर्वी जुन्या नालीतून हॉटेलचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती आता नव्याने केलेल्या खोदकामात फुटली आहे. नाली खोदकामातील माती रस्त्याच्या बाजुने टाकली जात आहे. नाली बांधकामात खराब पाणी साचत असल्याने ते अडचण ठरत आहे. यासाठी सोमवारला चक्क मशीन लाऊन नालीतील पाणी काढण्यात आले. तरी सुद्धा पाझर कायम आहे. हेच पाणी रोडवर येऊ लागल्याने माती आणि वाहणांमुळे रोडच्या बाजूला चिखल झाला आहे. त्यातच मोठा खड्डा असल्याने रात्रीच्या दरम्यान लख्ख प्रकाशाने तो दिसत नाही. यामुळे अनेकांची वाहने या खड्ड्यात जातात. यावर उपाययोजना म्हणून हॉटेल चालकाने मोठा खड्डा करुन त्यात पाणी जमा करणे सुरू केले आहे. तरीही अडचण कायम आहे. या संदर्भात हॉटेल व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा