शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

४९,४५८ शेतकरी कुटुंबांची स्वस्त धान्याकरिता भटकंती

By admin | Updated: February 28, 2017 01:12 IST

शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ मिळण्याकरिता विशेष पॅकेज अंतर्गत योजना राबविली.

जिल्ह्याचे आवंटन मंजूर : धान्य दुकानात पोहोचण्याकरिता आणखी काही दिवसांचा विलंब रूपेश खैरी वर्धाशासनाच्यावतीने शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ मिळण्याकरिता विशेष पॅकेज अंतर्गत योजना राबविली. आजस्थितीत योजनेंतर्गत वितरीत होणारे धान्य दुकानांत नसल्याने ही योजना कागदावर असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहे. यामुळे योजनेचे लाभार्थी असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४९ हजार ४५८ शेतकरी कुटुंबांची स्वस्त धान्याकरिता वाताहात होत आहे. धान्याकरिता स्वस्त धान्य दुकानात गेलेल्या शेतकऱ्यांना दुकान मालक तुमचे धान्य यायचे आहे, असे म्हणत आल्या पावली परत पाठवितो. हा प्रकार आजचा नाही तर गत दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. जिल्ह्यातील काही दुकानात तर शेतकरी पॅकेजचे धान्य उपलब्ध नसल्याचे फलक लावले आहे. यामुळे लाभार्थी शेतकरी कुटुंबाची चांगलीच पंचाईत होत आहे. शासनाच्या आदेशानुसार विशेष पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना धान्य पुरविण्याकरिता एकूण ८८८ दुकाने आहेत. या दुकानातून या शेतकऱ्यांना धान्याचा पुरवठा होत आहे. या सर्वच दुकानातून इतर लाभार्थ्यांना धान्य मिळत आहे. मात्र या विशेष पॅकेज योजनेतील लाभार्थी गेल्यास त्याला धान्य नसल्याचे सांगण्यात येते. या योजनेतील धान्यसाठ्याकरिता जिल्हा पुरवठा विभागाकडून मागणी केली होती. ती मागणी नुकतीच मान्य झाली असून त्याची रक्कम भारतीय खाद्य निगमच्या खात्यात जमा करण्याची तयारी पुरवठा विभागाने सुरू केली आहे. आवश्यक रक्कम भरल्यानंतर तत्काळ धान्याचा पुरवठा होईल अथवा नाही, याची शाश्वती नाही. यामुळे योजनेतील धान्याकरिता शेतकरी कुटुंबांना आखणी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हे सांगणे कठीण आहे. ७५० मेट्रिक टन गहू आणि ५०० मेट्रिक टन तांदळाला मंजुरी या योजनेतील लाभार्थ्यांना धान्य मिळावे याकरिता जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार ७५० मेट्रिक टन गहू आणि ५०० मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे. त्याकरिता आवश्यक रक्कम भरण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाकडून सुरू आहे. रक्कम भरल्यानंतरही हे धान्य किती दिवसात दुकानात पोहोचेल याची शाश्वती नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. खाद्य निगममध्ये हमालांचा घोळ रक्कम भरून धान्यसाठा दुकानात पोहोचविण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा प्रयत्न करीत आहे; मात्र येथे हमालांची कमतरता असल्याने त्यांच्याकडून गाड्या लोड होण्याकरिता विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे रक्कम भरूनही शेतकऱ्यांना तात्काळ धान्य मिळेल याची शाश्वती नसल्याची खंत पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या योजनेत आवश्यक असलेल्या धान्य साठ्याचे आवंटन नुकतेच मंजूर झाले आहे. त्याची रक्कम खाद्य निगमच्या खात्यात भरण्याची तयारी सुरू आहे. रक्कम वळती होताच दुकानात धान्य पोहोचण्याची व्यवस्था होणे अपेक्षित आहे; मात्र खाद्य निगममध्ये हमालांची असलेली कमतरता यात खोड ठरू शकते. यामुळे दुकानात धान्य पोहोचण्याकरिता आणखी किती दिवस लागतील हे सांगणे सध्या कटीण आहे. - अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.