शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

४.२५ लाख क्विंटल सोयाबीनची व्यापाऱ्यांनी केली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढली बऱ्यापैकी झाली.

ठळक मुद्देभरघोस भाववाढीची सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या मळणीच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. दिवाळीच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांनी मळणी करून सोयाबीनची थेट विक्रीही केली आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितींच्या यार्ड मध्ये शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी एकूण ४ लाख २५ हजार ६५९ क्विंटल सोयाबीनची खेरदी केल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढली बऱ्यापैकी झाली. परंतु, परतीच्या पावसाचा चांगलाच फटका अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीन पिकाला बसला आहे. शेतात कापून ढिग करून ठेवलेले सोयाबीन परतीच्या पावसादरम्यान ओले झाले. तर काही शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारात जाऊ नये म्हणून मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री केली. यंदा ३० ऑक्टोबरपर्यंत आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत २० हजार ३६८.३९ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी रेल्वेत ५९ हजार २६० क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे ३ लाख १६ हजार १११ क्विंटल, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ हजार २७ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव येथे १ हजार २७१.३९ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी येथे १२ हजार ९८४.७८ क्विंटल तर कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर येथे ६३६.८० क्विंटल सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली आहे. तशी नोंदही प्रशासनाने घेतली आहे. असे असले तरी भरघोस भाव वाढीची प्रतीक्षा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना आहे. सध्या मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत शेतकरी सोयाबीन विक्रीकरिता आणत आहेत.आद्रतेमुळे समाधानकारक भाव नाहीचपरतीच्या पावसामुळे अनेक शेतशिवारात शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले सोयाबीन ओले झाले. शिवाय ढगाळी वातावरण असल्याने पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीन वाळलेले नाही. जे सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी सध्या येत आहे त्यात आद्रता जास्त असल्याने व्यापारीही त्यावर बोट ठेवत पाहिजे तसा भाव देत नसल्याची ओरड सध्या सोयाबीन उत्पादकांकडून होत आहे.लेखी तक्रार केल्यास मिळणार नुकसान भरपाईपरतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे चांगलेच नुकसान केले आहे. जिल्ह्यात प्रत्यक्षात किती नुकसान झाले याची जुळवाजुळव सध्या शासकीय अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन परतीच्या पावसादरम्यान भिजले त्या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीबाबत लेखी स्वरूपात अर्ज आणि झालेल्या नुकसानीबाबतचे छायाचित्र तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिल्यास नुकसानग्रस्ताला नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे नुकसान केल्याचे वास्तव आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात झालेल्या नुकसानीची माहिती तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना द्यावी.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.सोयाबीन उत्पादकांनी त्यांचा शेतमाल बाजारपेठेत विक्रीकरिता आणताना वाळवून आणावा. जेणेकरून त्यांच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडूनही चांगला भाव मिळेल.- श्याम कार्लेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती