शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍याची ३४ तास वीरुगिरी

By admin | Updated: June 6, 2014 00:07 IST

पॉवर ग्रीड कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने टॉवरच्या बांधकामाचा बाजारभावानुसार योग्य मोबदला दिला नाही. तसेच दोन वर्षे शेती पडिक राहिल्यामुळे वायगाव(हळद्या) येथील प्रदीप सूर्यभान मून

गुरुवारी आंदोलन उघडकीस : वायगाव (हळद्या) येथील घटनासमुद्रपूर :पॉवर ग्रीड कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने टॉवरच्या बांधकामाचा बाजारभावानुसार योग्य मोबदला दिला नाही. तसेच दोन वर्षे शेती पडिक राहिल्यामुळे वायगाव(हळद्या) येथील प्रदीप सूर्यभान मून या शेतकरी युवकाने बुधवारपासून नुकसानभरपाईसाठी टॉवरवर चढून वीरुगिरी सुरु केली.२0१२ ला पॉवर ग्रीड कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने प्रदीप सूर्यभान मून यांच्या मालकीचे शेत सर्वे क्रमांक ५१४/२ मध्ये विद्युत लाईन टॉवर उभारणीला सुरुवात केली. कंपनीच्या अधिकार्‍यांनी टॉवर उभारणीसंबंधीचे सर्व व्यवहार प्रदीपचा मोठा भाऊ संदीप मून सोबत केले. प्रदीप बाहेरगावी असल्यामुळे त्याला कळविण्यात आले नाही. सुरुवातीला टॉवरचा पाया बांधणीचे ३५ हजार व त्यानंतर टॉवरच्या उभारणीचे ८४ हजार रुपये संदीपला देण्यात आले. उर्वरित रक्कम नंतर देण्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सर्व कागदापत्रांवर संदीप मूनच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. त्त्याचा भाऊ प्रदीप मून ला या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर ही रक्कम फार कमी मिळाल्याचे त्याच्या लक्षात आले. दोन वर्षापासून शेतातील विहिरीची टॉवरसाठी वीज कापण्यात आल्याने ओलीतही करता न आल्याने दोन वर्षे शेती पडिक राहिली. यात अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले. कंपनीच्या अधिकार्‍यांना भरपाईसंबंधी विचारले असता त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. पालकमंत्री राजेंद्र मुळक, पोलीस उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, ठाणेदार अनिल गिरडकर यांना निवेदन देण्यात आले. पण दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रदीप मून याने टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. पोलिस उपविभागीय अधिकारी व ठाणेदार गिट्टावार यांनी आंदोलनस्थळी जाऊन प्रदीपची मनधरणी केली; पण काहीही फायदा झाला नाही.(शहर प्रतिनिधी)